Vastu Tips: घरच नव्हे नशीब बिघडतं! कुटुंबाच्या दारिद्र्याचं हे कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रात सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा उल्लेक आहे. वास्तूनुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक ऊर्जा असते, मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक, ज्याचा प्रभाव घरातील लोकांवर पडतो. सकारात्मक उर्जेमुळे घरात सुख, समृद्धी आणि प्रगती येते, तर नकारात्मक उर्जेमुळे जीवनात अडचणींचे डोंगर निर्माण होतात. त्यामुळे कष्ट करूनही माणसाची आयुष्यात प्रगती होत नाही. तो नेहमी काळजीत असतो. ज्योतिषी पंडित गौरव कुमार दीक्षित सांगत आहेत अशाच काही उपायांबद्दल -
advertisement
1/7

घरात काही तुटलेली काच किंवा आरसा असेल किंवा त्यामध्ये तडा गेला असेल तर तो लगेच घरातून काढून टाकावा. तुमच्या खिडकीची काच तुटलेली असेल तर तीही बदला. असे मानले जाते की तुटलेली काच घरात नकारात्मक ऊर्जा आणते, ती घरात अजिबात ठेवू नका.
advertisement
2/7
देवदेवतांची जुनी फाटलेली चित्रे किंवा तुटलेली मूर्ती देव्हाऱ्यात ठेवू नये. देव्हाऱ्यात अशा काही वस्तू असल्यास त्या ताबडतोब काढून टाका. यामुळे आर्थिक नुकसान तसेच आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
advertisement
3/7
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कबुतरांचे घरटे होणे चांगले मानले जात नाही. घराच्या बाल्कनीत कबुतरे घरटे बनवू शकणार नाहीत, यासाठी आदीच उपाययोजना करा. यामुळे आर्थिक प्रगती खुंटू शकते.
advertisement
4/7
घरातील गंजलेले खराब कुलूप आणि चाव्या ताबडतोब काढून टाका. असे मानले जाते की घरात खराब कुलूप आणि चाव्या ठेवल्याने व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडचणी येतात.
advertisement
5/7
महाभारत युद्धाची चित्रे, नटराजाची मूर्ती, ताजमहालचे चित्र, बुडणारी बोट, कारंजे, जंगली हिंस्र प्राण्यांचे चित्र, कबरी, काटेरी झाडे घरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे जीवनातील आनंद नाहीसा होतो.
advertisement
6/7
घरामध्ये जुने फाटलेले कपडे असतील तर ते काढून टाका, फाटलेले कपडे किंवा जुने जोडे आणि चप्पल घरात ठेवल्यास अशुभ फळ मिळते आणि जीवनातील भौतिक सुख कमी होते.
advertisement
7/7
घरामध्ये एखादे बंद पडलेले घड्याळ, खराब चार्जर, खराब मोबाईल फोन, केबल, बल्ब किंवा इतर उपकरणे पडून असतील तर ती ताबडतोब काढून टाका. सदोष इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि राहू ग्रह वाईट परिणाम देऊ लागतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vastu Tips: घरच नव्हे नशीब बिघडतं! कुटुंबाच्या दारिद्र्याचं हे कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करेल