T20 World Cup : श्रीलंकेकडून 'करेक्ट कार्यक्रम' पण ऑस्ट्रेलिया अजूनही सुपर 8 मध्ये जाऊ शकते, पाहा कसं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia T20 World Cup 2026 Semifinal Scenario : श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. जाणून घ्या समीकरण
advertisement
1/7

श्रीलंकेच्या संघाने टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत धडाक्यात एन्ट्री केली आहे. पाथुम निसंका याने झळकावलेल्या ऐतिहासिक नाबाद शतकाच्या जोरावर श्रीलंकेने हा टप्पा गाठला असून, असा पराक्रम करणारा हा तिसरा संघ ठरला आहे.
advertisement
2/7
श्रीलंकेच्या ऑस्ट्रेलियावरील विजयामुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली असून बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धेतील अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलिया जवळजवळ वर्ल्ड कपमधून बाहेर झालीये.
advertisement
3/7
झिम्बाब्वेपाठोपाठ श्रीलंकेकडून मिळालेल्या या पराभवामुळे आता ऑस्ट्रेलियाला एकच गोष्ट सुपर 8 मध्ये पोहोचवू शकते, ती म्हणजे आर्यलँडचा विजय... ऑस्ट्रेलियाला सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी दुसऱ्या संघावर अवलंबून रहावं लागणार आहे.
advertisement
4/7
ऑस्ट्रेलियाला पाणी पाजणाऱ्या झिम्बॉब्वे संघाचा आगामी सामना आर्यलँडशी होणार आहे. जर या सामन्यात झिम्बॉब्वेने विजय मिळवला तर ते थेट सुपर 8 मध्ये पोहोचतील तर ऑस्ट्रेलियाला गाशा गुंडाळावा लागेल.
advertisement
5/7
पण जर आर्यलँडने बाजी मारली तर ऑस्ट्रेलियाला सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी काहीही करून मोठ्या फरकाने ओमानला धूळ चारावी लागेल. दोन मॅचनंतर झिम्बॉब्वेचा नेट रनरेट +1.984 आहे.
advertisement
6/7
तीन सामन्यातील दोन पराभवानंतर देखील ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट +0.414 आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा प्लस पाईंट आहे. त्यामुळे आता कांगारू मागील वनडे वर्ल्ड कपप्रमाणे यंदाही बाजी मारणार का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
7/7
दरम्यान, आज झिम्बॉब्वे आणि आर्यलँड यांच्यात सामना होईल. हा सामना पाहण्यासाठी आम्ही सज्ज आहेत, असं ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिशेल मार्श याने म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : श्रीलंकेकडून 'करेक्ट कार्यक्रम' पण ऑस्ट्रेलिया अजूनही सुपर 8 मध्ये जाऊ शकते, पाहा कसं?