T20 World Cup : ऑस्ट्रेलिया IN का Out... पॉईंट्स टेबल उलटं फिरलं, 24 तासात कांगारूंचा फैसला होणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियासमोर ग्रुप स्टेजलाच घरी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधी झिम्बाब्वे आणि त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा सुपर-8 ला जाण्याचा मार्ग बिकट झाला आहे.
advertisement
1/6

पथुम निसांकाने केलेल्या वादळी शतकाच्या जोरावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने धूळ चारली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेविरुद्ध 23 रननी पराभव झाला होता.
advertisement
2/6
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयासह श्रीलंकेने ग्रुप स्टेजमध्ये 3 पैकी 3 सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. ग्रुप बी मधून श्रीलंकेशिवाय आणखी एकच टीम प्रवेश करू शकते, ज्यात ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात स्पर्धा आहे.
advertisement
3/6
झिम्बाब्वेने 2 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, त्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये 4 अंकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 3 सामन्यात 1 विजय आणि 2 पराभवांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि आयर्लंडही तितक्याच पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.
advertisement
4/6
ऑस्ट्रेलिया सुपर-8 मध्ये प्रवेश करणार का नाही? आता 24 तासात ठरणार आहे. मंगळवारी झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल, या सामन्यात झिम्बाब्वेचा विजय झाला तर ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात येईल.
advertisement
5/6
दुसरीकडे झिम्बाब्वेचा आयर्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला तर ऑस्ट्रेलियाला ओमानविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवावा लागेल, तर ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा झिम्बाब्वेपेक्षा चांगला होईल आणि कांगारू 4 पॉईंट्ससह सुपर-8 मध्ये प्रवेश करतील.
advertisement
6/6
झिम्बाब्वेचा नेट रनरेट हा सध्या +1.984 इतका आहे, तर ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट +1.100 एवढा आहे. झिम्बाब्वे दोन्ही मॅच हरली आणि ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव केला तर ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांचे प्रत्येकी 4-4 पॉईंट्स होतील, अशा वेळी ज्या टीमचा नेट रनरेट चांगला असेल ती टीम सुपर-8 मध्ये जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ऑस्ट्रेलिया IN का Out... पॉईंट्स टेबल उलटं फिरलं, 24 तासात कांगारूंचा फैसला होणार!