'मला फरक पडत नाही...', अखेर विशालने मनातलं सांगूनच टाकलं; घरातील सदस्यांसमोर व्यक्त केलं रुचिताबद्दलचं प्रेम, म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vishal Kotian-Ruchita Jamdar: घरामध्ये नॉमिनेशनच्या प्रक्रियेने सर्व स्पर्धकांची झोप उडवली असतानाच, विशालने चक्क नॅशनल टेलिव्हिजनवर रुचिता जामदारचं नाव घेत प्रेमाची कबुली दिली आहे.
advertisement
1/7

मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात दररोज नवनवीन राडे पाहायला मिळतात, पण आजचा दिवस खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला तो विशाल कोटियन याच्या एका धाडसी कबुलीमुळे.
advertisement
2/7
घरामध्ये नॉमिनेशनच्या प्रक्रियेने सर्व स्पर्धकांची झोप उडवली असतानाच, विशालने चक्क नॅशनल टेलिव्हिजनवर रुचिता जामदारचं नाव घेत प्रेमाची कबुली दिली आहे. इतकंत नाही, तर विशालने घरातील टीकाकारांना चांगलंच सुनावलं आहे.
advertisement
3/7
या आठवड्यात नॉमिनेशनसाठी 'बादली' टास्क रंगला होता. ज्याला नॉमिनेट करायचं आहे, त्याला बादलीखाली बसवून कारण सांगायचं आणि त्यानंतर त्याच्या अंगावर पाणी ओतायचं, असा हा थरारक खेळ होता. जेव्हा विशालची पाळी आली, तेव्हा त्याने दिपालीला टार्गेट करत घरातील सुरू असलेल्या कुजबुजीला पूर्णविराम दिला.
advertisement
4/7
विशाल तावातावाने म्हणाला, "दिपाली जेव्हा रुचिताला बोलते, तेव्हा ती माझं नाव घेते. सगळे रुचिता-विशाल बोलतात. आता मी सगळ्यांसमोर बोलतो, मला ती आवडते. हे कॅमेरासमोर बोलायची माझ्यात हिंमत आहे आणि मला यात काहीही भीती नाही. आता ती मला आवडते, आमचं रिलेशन काय आहे, आमच्यात १५-२० वर्षांचा फरक आहे, आम्ही पुढे काय करणार, याबद्दल मला कोणालाही उत्तरं द्यायची नाहीत. तो माझा आणि तिचा प्रश्न आहे.
advertisement
5/7
विशालने दिपाली सय्यदवरही निशाणा साधला. दिपाली वारंवार म्हणायची की रुचिता नेहमी विशालच्या मागे-मागे फिरते. यावर संतापलेला विशाल म्हणाला, "जर ती माझं ऐकते, तर प्रॉब्लेम काय आहे? माणसांचा रिस्पेक्ट करा, वस्तूंना वापरा. इथे माणसं वस्तूंना वापरतात आणि माणसांचा अनादर करतात."
advertisement
6/7
विशालच्या या डायलॉगवर घरातील सदस्य अवाक झाले. रूपालीने परिस्थिती सावरण्यासाठी एक खोचक टोला लगावला, ती म्हणाली, "हे तुमचं प्रेम बिग बॉसच्या घराबाहेरही असंच टिकू दे." हे ऐकताच रुचिताचा पारा चढला. तिने रूपालीला झापत म्हटलं, "ती मला शिकवणार नाही, ती काय माझी आई आहे की बाप? माझं आयुष्य कसं जगायचं हे मला माहीत आहे."
advertisement
7/7
रुचिताने आधीच अनुश्रीकडे मन मोकळं केलं होतं. तिने म्हटलं होतं की, जेव्हा अख्खं घर तिच्या चुका काढतं, तेव्हा फक्त विशालच तिच्यातील चांगले गुण शोधतो. या दोघांच्या या उघड प्रेमामुळे आता घरातील इतर स्पर्धकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला फरक पडत नाही...', अखेर विशालने मनातलं सांगूनच टाकलं; घरातील सदस्यांसमोर व्यक्त केलं रुचिताबद्दलचं प्रेम, म्हणाला...