
छ.संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली. तेव्हा एक हातगाडा चालवणाऱ्या महिलेवर कारवाई करताना पोलीस दिसले. तेव्हा महिला आक्रोश करताना दिसत आहे, हा व्हिडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केला. भाजपचा महापौर झाल्यापासून मराठी-हिंदूंवर अन्याय होतोय. हा गरिबांचा आक्रोश पाहा असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.