TRENDING:

घटस्फोटानंतर Bigg Boss फेम अभिनेत्रीला डेट करतोय जय भानुशाली? जुन्या VIDEO ने फोडलं भिंग, खरं काय ते समोर आलंच

Last Updated:
Jay Bhanushali Dating Rumours: पत्नी माही विजपासून वेगळं होत असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जयचं नाव रिॲलिटी शो स्टार मायशा अय्यरसोबत जोडलं जाऊ लागलं.
advertisement
1/10
घटस्फोटानंतर Bigg Boss फेम अभिनेत्रीला डेट करतोय जय भानुशाली?
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी तिळाचा पर्वत होईल, याचा नेम लागत नाही. टेलिव्हिजनचा लाडका अभिनेता आणि होस्ट जय भानुशाली सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या कोणत्याही शोमुळे नाही, तर त्याच्या खासगी आयुष्यातील एका कथित अफेअरमुळे.
advertisement
2/10
पत्नी माही विजपासून वेगळं होत असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जयचं नाव रिॲलिटी शो स्टार मायशा अय्यरसोबत जोडलं जाऊ लागलं.
advertisement
3/10
एका कार्यक्रमातून बाहेर पडताना हे दोघं एकत्र दिसले आणि नेटकऱ्यांनी थेट "जयला नवीन जोडीदार सापडला" अशी अफवा सुरू केली. पण यामागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे.
advertisement
4/10
एका कार्यक्रमातून जय आणि मायशा एकत्र बाहेर पडले आणि एकाच गाडीतून निघून गेले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला. "१४ वर्षांचं लग्न तुटल्यावर इतक्या लवकर नवीन गर्लफ्रेंड?" अशा चर्चा रंगू लागल्या.
advertisement
5/10
४ जानेवारी २०२६ रोजी जय आणि माहीने अत्यंत समजूतदारपणे वेगळं होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे चाहत्यांसाठी ही बातमी पचवणं आधीच कठीण होतं, त्यात या डेटिंगच्या अफवांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं.
advertisement
6/10
मात्र, या अफवांमध्ये काहीच तथ्य नाहीये. जय आणि मायशा यांची ओळख 'बिग बॉस १५' मध्ये झाली होती. तिथे त्यांची मैत्री झाली, पण ती मैत्री प्रेमाची नाही तर बहीण-भावाची आहे.
advertisement
7/10
याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे २०२५ मध्ये मायशाने सोशल मीडियावर एक रील शेअर केली होती, ज्यामध्ये ती जयला राखी बांधताना दिसत होती आणि तिने त्याला "भैया" म्हटलं होतं.
advertisement
8/10
जय आणि माहीची जोडी ही टेलिव्हिजनवरील सर्वात आदर्श जोडी मानली जायची. एका पार्टीत भेट, त्यानंतर क्लबमध्ये झालेली पुन्हा भेट आणि अवघ्या तीन महिन्यांत जयने केलेलं प्रपोज यानंतर २०१० मध्ये त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं.
advertisement
9/10
"मी कॅसानोवा आहे असं सगळ्यांना वाटायचं, त्यामुळे माझ्या लग्नाला कोणीच आलं नव्हतं," अशी आठवण जयने एकदा एका शोमध्ये सांगितली होती.
advertisement
10/10
२०१९ मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या ताराचं आगमन झालं. त्याआधी त्यांनी आपल्या घरकामाला मदत करणाऱ्या व्यक्तीच्या मुलांचा (राजवीर आणि खुशी) सांभाळ करण्याची जबाबदारी घेऊन सर्वांची मनं जिंकली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
घटस्फोटानंतर Bigg Boss फेम अभिनेत्रीला डेट करतोय जय भानुशाली? जुन्या VIDEO ने फोडलं भिंग, खरं काय ते समोर आलंच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल