TRENDING:

त्याने केलेले रोल काढून बघा, मला फॉलो केलंय! लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल थेटच बोलले अशोक सराफ

Last Updated:
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची खास मैत्री होती. दोघांनी अनेक लोकप्रिय सिनेमांत एकत्र काम केलं.
advertisement
1/7
त्याने मला फॉलो केलंय! लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल थेटच बोलले अशोक सराफ
मराठी इंडस्ट्रीतील अभिनयाचे बादशाह ज्यांना म्हणतात ते म्हणजे अभिनेते अशोक सराफ. 80-90 चा काळ अशोक मामांनी गाजवला. अशोक सराफ यांच्याबरोबर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांनी इंडस्ट्री गाजवली.
advertisement
2/7
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची खास मैत्री होती. दोघांनी अनेक लोकप्रिय सिनेमांत एकत्र काम केलं होतं. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं खूप कौतुक केलं. तसंच त्यांच्या काही न आवडलेल्या गोष्टीही सांगितल्या. 
advertisement
3/7
मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी बोलकाना अशोक सराफ म्हणाले, "लक्ष्या एक टॅलेंटेड आर्टिस्ट होता. काय काय आर्टिस्टने काहीही बॅकग्राऊंड नसताना आपलं करिअर सुरू केलं आहे त्यातील तो एक आहे."
advertisement
4/7
"त्याला आगापिछा काहीच नाही. नाटकाचं नाही, सिनेमाचं नाही कसंलच बॅकग्राऊंड नाही. घरी कोणी केलेलं आहे, मोठा नट आहे असं काहीही नाही. बारीक बारीक रोल करून तो पुढे आला. हे त्याच्यासाठी क्रिडिटेबल आहे. कोणाचाही आधार नसताना त्याने हे केलं."
advertisement
5/7
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कामाबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले, "त्याने केलेले सगळे रोल तुम्ही जर काढून बघितले तर त्याचे आणि माझे रोल हे मला फॉलो केल्यासारखे आहेत. त्याने स्ट्रेट मला फॉलो केलेलं आहे अर्थात त्याने ते वेगळ्या स्टाइलने केलेत. स्टाइल वेगळी होती पण एकंदरीत टायमिंग तेच आहे."
advertisement
6/7
अशोक सराफ पुढे म्हणाले, "फार लवकर गेला होता.नाहीतर त्याने बरंच काही केलं असतं. त्याचा ड्रॉबॅक एवढाच झाला की तो कॉमेडी तर कॉमेडीच घेऊन बसला. त्याने व्हरायटी काहीच केली नाही. आम्ही दोघांनी मिळून 50 सिनेमात एकत्र काम केलं. तो माझ्याबरोबर नेहमी सहाय्यक होता. मी हिरो तर तो माझा भाऊ, ड्रायव्हर किंवा आणि कोणी. त्याची एक वेगळी स्टोरी सिनेमात असायची."
advertisement
7/7
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या काळात मराठी सिनेसृष्टी गेली होती. यावर अशोक सराफ म्हणाले, "ज्यावेळेस राजा परांजपे, मास्टर विनायक काम करायचे ती वेगळी स्टाइल होती. ती हळू हळू कमी होत गेली. पिढी बदलली तसे विनोद बदलले, अँक्शन बदलत गेल्या. जमाना फास्ट झाला. त्यावेळेला आम्ही खुसलो. आम्ही लोकांना थिएटरमध्ये येण्यासाठी भाग पाडलं. लोक त्यावेळेस थिएटरला यायचे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
त्याने केलेले रोल काढून बघा, मला फॉलो केलंय! लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल थेटच बोलले अशोक सराफ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल