
छत्रपती शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिले पाहिजे. कारण त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात शौर्य गाजवले, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याप्रकरणी हिंदू संघटनांनी आंदोलन केले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून प्रशासनाने फोटो काढण्याचा निर्णय घेतला. या वादावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांच्या फोटो लावण्याचे समर्थन केले. त्यानंतर आता हिंदुत्ववादी संघटनांनी टोलेबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे