T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम, झिम्बाब्वेची एन्ट्री... टीम इंडियाचे 'नॉक आऊट' सामने ठरले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजचे सामने आता शेवटच्या टप्प्यावर आले आहेत. आतापर्यंत सुपर-8 मध्ये 5 टीम क्वालिफाय झाल्या आहेत, तर अजूनही 3 टीमचा प्रवेश शिल्लक आहे.
advertisement
1/6

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने प्रवेश मिळवला आहे. तर नामिबिया, ओमान, स्कॉटलंड, इटली, नेपाळ, या टीम स्पर्धेतून बाहेर झाल्या आहेत.
advertisement
2/6
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजमध्येही 4-4 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. 5 टीम आधीच सुपर-8 मध्ये क्वालिफाय झाल्यामुळे आता टीम इंडिया कुणाविरुद्ध खेळणार, हे निश्चित झालं आहे.
advertisement
3/6
सुपर-8 मध्ये टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आल्या आहेत, तर झिम्बाब्वे किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यातली एक टीम भारताच्या ग्रुपमध्ये असेल. झिम्बाब्वेने मंगळवारी आयर्लंडचा पराभव केला तर झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये प्रवेश करेल.
advertisement
4/6
सुपर-8 मध्ये टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रकही निश्चित झालं आहे. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया त्यांचा शेवटचा सामना 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध खेळेल, त्यानंतर 22 फेब्रुवारीला सुपर-8 मध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल.
advertisement
5/6
सुपर-8 मध्ये भारताचा दुसरा सामनाव 26 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे किंवा आयर्लंड यांच्यापैकी सुपर-8 मध्ये प्रवेश करणाऱ्या एका टीमविरुद्ध होईल. तर 1 मार्चला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुपर-8 ची शेवटची लढत असेल.
advertisement
6/6
या ग्रुपमधून टॉप-2 टीम या सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. ज्यात त्यांचा सामना दुसऱ्या ग्रुपमधून आलेल्या टॉप-2 टीमविरुद्ध होईल. सेमी फायनलमध्ये विजय मिळवलेल्या दोन टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळतील. सुपर 8 मध्ये प्रत्येक टीमला 3 पैकी 2 मॅच जिंकाव्या लागणार आहेत, म्हणजेच सुपर-8 ची स्पर्धा ही नॉक आऊटसारखीच खेळावी लागणार आहे, कारण एकही पराभव टीमला अडचणीत आणू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम, झिम्बाब्वेची एन्ट्री... टीम इंडियाचे 'नॉक आऊट' सामने ठरले!