TRENDING:

BCCI कडून शाहरूख खानला स्पष्ट आदेश! 9.20 कोटीच्या खेळाडूची IPL मधून हकालपट्टी, KKR ला दिली नवी ऑफर

Last Updated:
BCCI Ask KKR to Release Mustafizur Rahman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी कोलकाता नाईट रायडर्स या टीमला बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमान याला रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
1/8
BCCI कडून शाहरूख खानला स्पष्ट आदेश! 9.20 कोटीच्या खेळाडूची IPL मधून हकालपट्टी
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी केकेआरला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, त्यांनी बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानला तातडीने संघातून रिलीज करावे.
advertisement
2/8
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी कोलकाता नाईट रायडर्स या टीमला बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमान याला रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
3/8
देशातील सध्याची परिस्थिती आणि वाढता वाद लक्षात घेता बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. 'बीसीसीआय'ने स्पष्ट केलं आहे की, जर केकेआरला या खेळाडूच्या जागी दुसरा पर्याय हवा असेल, तर त्यांना तशी परवानगी दिली जाईल.
advertisement
4/8
शाहरुख खान यांच्या मालकीच्या केकेआरने डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात मोठी रक्कम खर्च करून मुस्तफिजुर रहमान याला आपल्या ताफ्यात सामील केलं होतं. 9.20 कोटी रुपयात त्याला सामील करण्यात आलं होतं.
advertisement
5/8
आयपीएल 2026 साठी झालेल्या लिलावात मुस्तफिजुर रहमानसाठी केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात मोठी चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेर 2 कोटी बेस प्राईस असलेल्या मुस्तफिजुरला कोलकाताने आपल्या यादीत स्थान दिलं होतं.
advertisement
6/8
मात्र, त्याला टीममध्ये घेतल्यापासून सोशल मीडियावर शाहरुख खान आणि केकेआरवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. लिलावात सहभागी झालेल्या 7 बांगलादेशी खेळाडूंपैकी केवळ मुस्तफिजुरलाच खरेदीदार मिळाला होता, पण आता त्याला बाहेर पडावे लागणार आहे.
advertisement
7/8
डिसेंबरमध्ये पार पडलेल्या खेळाडूंच्या मिनी लिलावात बांगलादेशचे एकूण 7 खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, तंजीम हसन साकिब, नाहिद राणा, रकीबुल हसन, मोहम्मद शोरिफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान या नावांचा समावेश होता.
advertisement
8/8
दरम्यान, फक्त मुस्तफिजुर रहमानला खरेदीदार मिळाला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा विरोध म्हणून मुस्तफिजुर रहमान याची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पण खेळावृत्तीला शोभणारी ही भूमिका आहे का? असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
BCCI कडून शाहरूख खानला स्पष्ट आदेश! 9.20 कोटीच्या खेळाडूची IPL मधून हकालपट्टी, KKR ला दिली नवी ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल