TRENDING:

Cheteshwar Pujara : ना सचिनला जमलं, ना विराटला... पुजाराचे हे 3 रेकॉर्ड यापुढेही तुटणार नाहीत!

Last Updated:
चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पुजाराने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. पुजाराने त्याच्या करिअरमध्ये अशी काही रेकॉर्ड केली आहेत, जी मोडणं कुणालाही शक्य होणार नाही.
advertisement
1/8
ना सचिनला जमलं, ना विराटला... पुजाराचे हे 3 रेकॉर्ड यापुढेही तुटणार नाहीत!
चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पुजारा भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळलेल्या काही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पुजाराने 103 टेस्ट मॅचमध्ये 19 शतकं आणि 55 अर्धशतकांच्या मदतीने 7,195 रन केल्या.
advertisement
2/8
राहुल द्रविडने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चेतेश्वर पुजाराने त्याची जागा घेतली आणि तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत अनेक विक्रम नावावर केले. पुजाराने जवळपास 10 वर्ष टीम इंडियाला राहुल द्रविडची कमतरता भासू दिली नाही.
advertisement
3/8
चेतेश्वर पुजाराने 9 ऑक्टोबर 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 2023 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल पुजाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली शेवटची मॅच ठरली. 13 वर्षांच्या या कारकिर्दीमध्ये पुजाराने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले, हे विक्रम मोडणं अशक्य आहे.
advertisement
4/8
चेतेश्वर पुजारा हा एका टेस्टच्या इनिंगमध्ये 500 बॉल खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. 2017 साली रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पुजाराने 525 बॉल खेळून 202 रन केल्या.
advertisement
5/8
पुजाराने त्याचं द्विशतक 672 मिनिटं बॅटिंग करून पूर्ण केले, ज्यात त्याने 38.47 च्या स्ट्राईक रेटने 21 फोर मारल्या. भारताकडून 11 खेळाडूंनी एका टेस्ट इनिंगमध्ये 400 पेक्षा जास्त बॉल खेळले, पण पुजारा वगळता 500 पेक्षा जास्त बॉल खेळता आलेले नाहीत. पुजारानंतर राहुल द्रविडने एका टेस्ट इनिंगमध्ये 495 बॉल खेळले.
advertisement
6/8
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये फक्त 13 खेळाडूंनाच पाचही दिवस बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे, यामध्ये पुजाराचंही नाव आहे.
advertisement
7/8
2017 साली श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता टेस्टमध्ये पुजाराने 52 आणि 22 रन केले, तेव्हाच पावसाने सामन्यामध्ये व्यत्यय आणला, त्यामुळे त्याला पाचही दिवस बॅटिंगची संधी मिळाली.
advertisement
8/8
चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी आणि टेस्ट क्रिकेटमध्ये मिळून 18 द्विशतकं केली आहेत. डॉन ब्रॅडमन, वॅली हॅमाँड आणि पेट्सी हेन्ड्रेन यांनाच पुजारापेक्षा जास्त द्विशतकं करण्यात आली आहेत. या यादीमध्ये पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Cheteshwar Pujara : ना सचिनला जमलं, ना विराटला... पुजाराचे हे 3 रेकॉर्ड यापुढेही तुटणार नाहीत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल