TRENDING:

IPL सुरु होऊन आठवडा उलटला, तरी तो आला नाही, 12 कोटीच्या खेळाडूने टीमला फसवलं

Last Updated:
आयपीएलमध्ये अनेक असे विदेशी खेळाडू आहेत, ज्यांना फ्रेंचायजीने खूप मोठ्या किमतीत ताफ्यात घेतलं आहे. मात्र अद्याप हे खेळाडू आयपीएलमध्ये दाखलच झाले नाहीयेत.
advertisement
1/7
IPL सुरु होऊन आठवडा उलटला, तरी तो आला नाही, 12 कोटीच्या खेळाडूने टीमला फसवलं
आयपीएल 2026 चा हंगाम सूरू होऊन जवळपास आठवड्याहून अधिकचा कालावधी उलटला आहे. पण अद्याप अनेक खेळाडू आयपीएलशी जोडलेच गेले नाही आहेत.
advertisement
2/7
आयपीएलमध्ये अनेक असे विदेशी खेळाडू आहेत, ज्यांना फ्रेंचायजीने खूप मोठ्या किमतीत ताफ्यात घेतलं आहे. मात्र अद्याप हे खेळाडू आयपीएलमध्ये दाखलच झाले नाहीयेत.
advertisement
3/7
अशात आता दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला आहे. कारण त्यांचा 12 कोटीचा खेळाडू अद्याप टीममध्ये दाखल झाला नाही आहे.त्याला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आहे. मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने 12 कोटीला ताफ्यात घेतलं होतं.
advertisement
5/7
दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामान्यात दिल्लीचा विजय झाला आहे. पण त्याचा स्टार खेळाडू मिसेल स्टार्क या सामन्याला मुकला होता. पण तो आता आणखी काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.त्यामुळे दिल्लीला मोठा झटका बसणार आहे.
advertisement
6/7
मिडिया रिपोर्टनुसार, मिचेल स्टार्कच्या खांदा आणि कोपऱ्याच्या दुखापतीचा सामना करतो आहे.त्यामुळे तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही आहे. पण तो 20 एप्रिलपर्यंत खेळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
जर असे झाल्यास तो आणखीन तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स 8 एप्रिलला गुजरात टायटन्स, 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि 18 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे. त्यामुळे या सामन्यात स्टार्क खेळणार नाही.त्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL सुरु होऊन आठवडा उलटला, तरी तो आला नाही, 12 कोटीच्या खेळाडूने टीमला फसवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल