TRENDING:

RR vs MI Live : मुंबई-राजस्थान सामना संकटात, गुवाहाटीमध्ये पाऊस, किती वाजता होणार टॉस?

Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होत आहे. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये हा सामना होत आहे.
advertisement
1/6
मुंबई-राजस्थान सामना संकटात, गुवाहाटीमध्ये पाऊस, किती वाजता होणार टॉस?
मुंबई आणि राजस्थान यांच्यातल्या या सामन्याआधीच गुवाहाटीमध्ये पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे या सामन्यावरही संकट ओढावलं आहे. याआधी सोमवारचा केकेआर आणि पंजाब यांचा सामनाही पावसामुळे रद्द झाला. पावसामुळे मुंबई आणि राजस्थान सामन्याचा टॉस अजून झालेला नाही.
advertisement
2/6
आयपीएलच्या या मोसमात राजस्थानने त्यांचे 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत, त्यामुळे 4 पॉईंट्ससह राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात विजय मिळून पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
advertisement
3/6
दुसरीकडे मुंबई इंडियन्सने केकेआरविरुद्ध विजय मिळवून मोसमाची सुरूवात चांगली केली, पण त्यांना दिल्लीविरुद्ध पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे 2 सामन्यांमध्ये 2 पॉईंट्स मिळवून मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.
advertisement
4/6
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याचं मुंबईच्या टीममध्ये कमबॅक झालं आहे. दिल्लीविरुद्ध हार्दिक पांड्या खेळला नव्हता, त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवने मुंबईचं नेतृत्व केलं होतं.
advertisement
5/6
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत, यात मुंबईचा 16 सामन्यांमध्ये विजय झाला आहे, तर राजस्थानने 14 मॅच जिंकल्या आहेत.
advertisement
6/6
हार्दिक पांड्याचं टीममध्ये कमबॅक झाल्यामुळे मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल व्हायची शक्यता आहे. दीपक चहरऐवजी हार्दिक टीममध्ये येईल तर कॉर्बिन बॉश ऐवजी ट्रेन्ट बोल्टही टीममध्ये कमबॅक करण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RR vs MI Live : मुंबई-राजस्थान सामना संकटात, गुवाहाटीमध्ये पाऊस, किती वाजता होणार टॉस?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल