TRENDING:

Cricket Rules : महिला अन् पुरुषांसाठी क्रिकेटचे वेगळे नियम, पूर्ण वर्ल्ड कप पाहिला, पण नोटीस केलंत का?

Last Updated:
भारताने महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. भारताच्या महिला टीमला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकता आला, यानंतर देशभरात जल्लोष केला गेला.
advertisement
1/12
महिला अन् पुरुषांसाठी क्रिकेटचे वेगळे नियम, वर्ल्ड कप पाहिला, पण नोटीस केलं का?
भारतीय महिला टीमचे सामने पाहण्यासाठी स्टेडियमही भरलेली होती. तसंच फायनलमध्ये टीव्ही आणि मोबाईलच्या प्रेक्षक संख्येने सगळी रेकॉर्ड ब्रेक केली. तुम्हीही वर्ल्ड कपचे सामने बघितले असतील, पण पुरुष आणि महिला क्रिकेटसाठीचे वेगळे नियम तुम्हाला कळाले का?
advertisement
2/12
पुरुष आणि महिला क्रिकेटमधला सगळ्यात मोठा फरक हा बॉलच्या आकाराचा आणि वजनाचा आहे. महिला क्रिकेटमध्ये 4.94 आऊन्स ते 5.31 आऊन्स म्हणजेच 140 ग्रॅम ते 151 ग्रॅम वजनाचा बॉल वापरला जातो. महिला क्रिकेटच्या बॉलचा घेर 8.25 इंच ते 8.88 इंच असतो. त्या तुलनेत पुरुषांच्या क्रिकेट बॉलचे वजन 5.5 आऊन्स ते 5.75 आऊन्स (156 ते 163 ग्रॅम) एवढे असते.
advertisement
3/12
महिला आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये बाऊंड्री लाईनचं अंतरही वेगवेगळं असतं. महिला क्रिकेटमध्ये बाऊंड्री लाईन पिचपासून 70 यार्ड (64 मीटर) पेक्षा जास्त आणि 60 यार्ड (54.86 मीटर) पेक्षा कमी नसावी. याउलट पुरुष क्रिकेटमध्ये बाऊंड्री लाईन मोठी असते. पुरुष क्रिकेटमध्ये बाऊंड्री कमीत कमी 65 यार्ड (59.43) आणि जास्तीत जास्त 90 यार्ड (82.29 मीटर) लांब असावी.
advertisement
4/12
फिल्डर 8 मिनिटांपेक्षा जास्त काळ मैदानाबाहेर असेल, तर महिलांच्या क्रिकेटमध्ये त्यांना 110 मिनिटं बॅटिंग अथवा बॉलिंग करता येत नाही, पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हा दंड 120 मिनिटांचा आहे.
advertisement
5/12
वनडेमध्ये महिला क्रिकेटच्या इनिंगचा ब्रेक 30 ते 45 मिनिटांचा असू शकतो, पण पुरुष क्रिकेटमध्ये हा ब्रेक 30 मिनिटांपेक्षा जास्त असू शकत नाही.
advertisement
6/12
महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये फक्त एकच पॉवर प्ले असतो, जो पुरुष क्रिकेटच्या पहिल्या पॉवर प्लेसारखा असतो (आऊटफिल्डमध्ये पहिल्या 10 ओव्हरसाठी फक्त 2 फिल्डर). पॉवर प्ले संपल्यानंतर आऊटफिल्डमध्ये फक्त 4 फिल्डरना परवानगी आहे. याउलट पुरुषांच्या वनडेमध्ये तीन पॉवर प्ले असतात.
advertisement
7/12
टी-20 क्रिकेटमध्ये महिलांच्या सामन्यात इनिंगचा ब्रेक 15 मिनिटांचा असतो, तर पुरुषांच्या टी-20 सामन्यात हा ब्रेक 20 मिनिटांचा असतो.
advertisement
8/12
महिला क्रिकेटमध्ये ओव्हर रेट पुरुषांच्या क्रिकेटपेक्षा वेगळा असतो. महिला क्रिकेटमध्ये टेस्टचा ओव्हर रेट 15.59 ओव्हर प्रती तास अपेक्षित असतो, तर पुरुषांसाठी हाच ओव्हर रेट 14.28 ओव्हर प्रती तास असतो. टी-20 मध्ये महिला क्रिकेटसाठी प्रती तासाचा ओव्हर रेट 16 ओव्हरचा, तर पुरुष क्रिकेटसाठी 14.11 ओव्हर प्रती तासाचा असतो.
advertisement
9/12
महिलांच्या टेस्ट मॅचसाठी बहुतेकदा तीन अंपायर असतात, जे मॅचचं आयोजन करणारा देश नियुक्त करतो. दुसरीकडे पुरुषांच्या टेस्ट मॅचमध्ये चार अंपायर असतात आणि आयसीसी त्यांना एलिट यादीतून नियुक्त करते. तसंच पुरुषांच्या टेस्टचे पंच हे न्यूट्रल म्हणजेच मॅच खेळणाऱ्या दोन देशांचे नसतात.
advertisement
10/12
टेस्ट क्रिकेटमध्ये रोज टाकल्या जाणाऱ्या ओव्हरची संख्याही महिला आणि पुरुष क्रिकेटसाठी वेगळी असते. महिलांना टेस्ट क्रिकेटमध्ये दिवसाला 100 ओव्हर किंवा प्रती तास 17 ओव्हर टाकाव्या लागतात. तर शेवटच्या दिवशी महिलांना 83 ओव्हर (प्रती तास 17 ओव्हर) पूर्ण करणं आवश्यक असतं. पुरुषांसाठी दिवसाला 90 ओव्हर (प्रती तास 15 ओव्हर) टाकणं बंधनकारक आहे.
advertisement
11/12
टेस्ट क्रिकेटमध्ये महिलांच्या सामन्यात 150 रनची आघाडी असेल तर फॉलो-ऑन लागू करता येतो, तर पुरुषांच्या टेस्ट क्रिकेटमध्ये फॉलो-ऑन देण्यासाठी 200 रनच्या आघाडीची गरज असते.
advertisement
12/12
पुरुषांची टेस्ट मॅच ही जास्तीत जास्त 5 दिवसांची असते, पण महिलांची टेस्ट मॅच चार किंवा पाच दिवसांची खेळवली जाऊ शकते. मॅच आधी दोन्ही देशांचे बोर्ड किती दिवसांची टेस्ट खेळवायची याचा निर्णय घेतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Cricket Rules : महिला अन् पुरुषांसाठी क्रिकेटचे वेगळे नियम, पूर्ण वर्ल्ड कप पाहिला, पण नोटीस केलंत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल