TRENDING:

Hingoli: कंटेनरला लागली अचानक आग, महामार्गावर पडला नव्या कोऱ्या फ्रीजचा ढीग, PHOTOS

Last Updated:
हिंगोलीतील नांदेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर द बर्निंग कंटेनरचा थरार पाहायला मिळाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (मनीष खरात, प्रतिनिधी)
advertisement
1/6
कंटेनरला लागली अचानक आग, महामार्गावर पडला नव्या कोऱ्या फ्रीजचा ढीग, PHOTOS
हिंगोलीतील नांदेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर द बर्निंग कंटेनरचा थरार पाहायला मिळाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंटेनर मधील 30 ते 40 फ्रिज व ट्रकचे मोठं नुकसान झालं.
advertisement
2/6
आज शनिवारी सायंकाळी कळमनुरी तालुक्यातील दातीफाटा शिवारात राष्ट्रीय महामार्गावर एका कंटेनरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.
advertisement
3/6
दिल्लीहून चेन्नईकडे फ्रिजची वाहतूक करणाऱ्या या कंटेनरच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आलं.
advertisement
4/6
त्यानंतर चालकाने तात्काळ कंटेनर थांबवून चालक केबिनच्या बाहेर पडला. परंतु ही आग भडकल्या गेली. सुदैवाने या घटनेमध्ये चालकाला काही इजा झाली नाही.
advertisement
5/6
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली, त्याचबरोबर अग्निशामन दलाने देखील धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली.
advertisement
6/6
या आगीमध्ये जवळपास 30 ते 40 फ्रीज जळून खाक झाले आहेत व कंटेनरचे देखील जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Hingoli: कंटेनरला लागली अचानक आग, महामार्गावर पडला नव्या कोऱ्या फ्रीजचा ढीग, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल