वडिलांना सिंगर बनवायचं होतं, पण त्याने माईकऐवजी हातात बॅट धरली, टीम इंडियाला असा मिळाला नवा कॅप्टन
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मी सहा वर्षाचा असताना सकाळी 4 वाजता उठायचो.मला आई वडील नव्हे तर मी स्वत: उठायचो आणि 5.30 ची लोकल पकडून जायचो.
advertisement
1/7

तुम्हाला आयुष्यात मोठं होऊन काय बनायचं असतं, याचा निर्णय आपले आई वडील लहानपणीच घेत असतात. पण या घटनेत आई वडिलांना मुलाला सिंगर बनवायचं होतं पण त्याने माईक ऐवजी हातात बॅट धरली आणि तो क्रिकेटर बनला.
advertisement
2/7
त्याचं झालं असं की वडिलांना लहान वयात त्याला सिंगर बनवायचं होतं. या दरम्यान ते त्याला क्रिकेटदेखील खेळवत होते. यावेळी त्यांना मी क्रिकेट देखील खेळू शकतो हे कळलं आणि त्यांनी मला सिंगर न बनवता क्रिकेटर बनवण्याच ठरवलं.
advertisement
3/7
तसेच क्रिकेटर बनला तर फिट राहिल आणि चांगल खाईल देखील त्यामुळे त्यांनी त्याला क्रिकेटर बनवण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याला अॅकेडमीत प्रवेश दिला.
advertisement
4/7
दरम्यान मी सहा वर्षाचा असताना सकाळी 4 वाजता उठायचो.मला आई वडील नव्हे तर मी स्वत: उठायचो आणि 5.30 ची लोकल पकडून जायचो.
advertisement
5/7
पहिल्यांदा मी शाळेत जायचो आणि त्यानंतर दुपारी मी चर्चगेटमधील दिलीप वेंगसकर अकादमीत प्रॅक्टीस करायला जायचो. माझ्या क्रिकेटमुळे वडील नोकरी सोडणार होते. पण आजोबांनी त्यांना रोखलं आणि मला ने आण करायची जबाबदारी त्यांनी उचलली.त्यामुळे मी रोज प्रॅक्टीससाठी आजोबांसोबत यायचो.
advertisement
6/7
मला क्रिकेटर बनवण्याच माझे आजोबा आणि काकांचा मोठा हात होता. कारण ते जर नसते तर मी इथवर पोहोचलो नसतो,असे तो सांगतो.
advertisement
7/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा अंडर 19 कर्णधार आयुश म्हात्रे आहे. आयुश म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकला होता. पण या वर्ल्ड कपसाठी त्याने किती संघर्ष केला, हे वरील गोष्टी वाचून कळतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
वडिलांना सिंगर बनवायचं होतं, पण त्याने माईकऐवजी हातात बॅट धरली, टीम इंडियाला असा मिळाला नवा कॅप्टन