T20 World Cup जिंकण्याआधीच गौतम गंभीरला मोठी ऑफर, हेडकोच पद सोडलं तर 'ट्रिपल पोस्ट' मिळणार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir Rajasthan Royals offer : मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सच्या तीन नव्या शेअरहोल्डर्सपैकी एकाने गौतमला 'पार्टनर, मेंटॉर आणि सीईओ' अशा तीन मोठ्या जबाबदाऱ्यांचा प्रस्ताव दिला आहे.
advertisement
1/7

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय टीमचा हेड कोच म्हणून काम पाहणाऱ्या गौतमला आता पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतण्याची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे गंभीर कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
advertisement
2/7
2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याने टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता गंभीर केकेआरची साथ सोडून राजस्थानकडे जाणार का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
3/7
मात्र, राजस्थान रॉयल्सच्या (RR) नव्या मालकांकडून त्याला मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गंभीरला तीन मोठ्या जबाबदाऱ्यांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.
advertisement
4/7
मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सच्या तीन नव्या शेअरहोल्डर्सपैकी एकाने गौतमला 'पार्टनर, मेंटॉर आणि सीईओ' अशा तीन मोठ्या जबाबदाऱ्यांचा प्रस्ताव दिला आहे.
advertisement
5/7
यामध्ये त्याला केवळ मॅनेजमेंटमध्ये स्थान नाही, तर दोन ते तीन टक्के मालकी हिस्सा देण्याचेही प्रलोभन दाखवण्यात आलं आहे. मात्र, गौतम सध्या भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य प्रशिक्षक असल्याने त्याला हा प्रस्ताव तातडीने स्वीकारता येणार नाही.
advertisement
6/7
लोढा समितीच्या शिफारशींनुसार, कोणताही व्यक्ती एकाच वेळी भारतीय संघ आणि आयपीएल फ्रेंचायझीमध्ये पद भूषवू शकत नाही. जर त्याला राजस्थानच्या या ऑफरचा विचार करायचा असेल, तर त्याला पहिल्यांदा टीम इंडियाच्या कोच पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
advertisement
7/7
दरम्यान, गौतम आणि बीसीसीआय यांच्यातील सध्याचा करार 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत आहे. त्यामुळे गंभीर आता राजस्थान रॉयल्सची ऑफर स्विकारणार का? असा सवाल विचारू जाऊ लागला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup जिंकण्याआधीच गौतम गंभीरला मोठी ऑफर, हेडकोच पद सोडलं तर 'ट्रिपल पोस्ट' मिळणार!