TRENDING:

IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी कोलकातामधून समोर आली गुड न्यूज!

Last Updated:
India vs West Indies Weather Report : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुपर 8 फेरीतील अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. अशातच आता कोलकातामधून गुड न्यूज समोर आली आहे.
advertisement
1/7
IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने 72 धावांनी विजय मिळवला असून टीम इंडियाचा नेट रनरेट चांगला सुधारला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
advertisement
2/7
दुसरीकडे साऊथ अफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केल्याने आता टीम इंडियाला नेट रनरेटचं टेन्शन नसेल. परंतू एक गोष्टीमुळे नेट रनरेटवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
3/7
ही गोष्ट म्हणजे पाऊस... जर मॅचमध्ये पाऊस आला अन् मॅच खेळली गेली नाही तर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल अन् वेस्ट इंडिज सेमीफायनलला जाईल.
advertisement
4/7
पण अशातच या मॅचपूर्वी टीम इंडियाला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. 1 मार्च रोजी म्हणजेच मॅचच्या दिवशी पावसाचा थेंबही पडणार नाही, अशी माहिती हवामान खात्याकडून मिळाली आहे.
advertisement
5/7
मॅचच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत शून्य टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त मॅच जिंकायची आहे.
advertisement
6/7
वेस्ट इंडिजच्या हातात सध्या दोन पाईंट्स आहेत. तर टीम इंडियाकडे देखील दोन पाईंट्स आहेत. या दोन्हीपैकी जी टीम मॅच जिंकेल ती टीम सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, कोलकाताच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाला मोठ्या ताकदीने उतरावं लागणार आहे. वेस्ट इंडिज भारताविरुद्ध नव्या रणनितीने उतरणार असल्याने सूर्याने कठोर निर्णय घ्यावे लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी कोलकातामधून समोर आली गुड न्यूज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल