TRENDING:

IND vs PAK सामन्याआधी ICCचा मोठा निर्णय, जय शहा मोहसीन नक्वी समोरा समोर येणार, हायव्होल्टेज ड्रामा होणार?

Last Updated:
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडीअमवर भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत पार पडणार आहे. या लढती दरम्यान आयसीसीने बैठक बोलावली आहे.
advertisement
1/7
IND vs PAK सामन्याआधी ICCचा मोठा निर्णय, जय शहा मोहसीन नक्वी समोरा समोर येणार, ह
येत्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.
advertisement
2/7
या सामन्याची जगभरातील क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे हा सामना भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या भयंकर वादानंतर पुन्हा खेळवला जातो आहे.त्यामुळे त्याची उत्सुकता वेगळीच आहे.
advertisement
3/7
या सामन्याला अवघे आता तीन दिवस उरले असताना आता आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी आमने सामने येणार आहेत.त्यामुळे दोन्ही बोर्डामध्ये गरमागरमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी ही माहिती दिली आहे.ते म्हणाले ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आशिया क्रिकेट खेळणाऱ्या 5 देशांना आमंत्रित केले आहे. ही बैठक भारत पाकिस्तान सामन्या दरम्यान होणार आहे.
advertisement
5/7
आयसीसीची इच्छा आहे की पाच देशांची बैठक व्हावी,असे बीसीबी बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
advertisement
6/7
या बैठकीच्या माध्यमातून पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील क्रिकेट संबंध सुधारण्याचा प्रयत्न होणार आहे.कारण पाकिस्तानच्या बॉयकॉटमुळे तीनही देशातील संबंध खराब झाली होती.
advertisement
7/7
दरम्यान या मुलाखतीत अमिनुल इस्लामने यांनी मी स्वता: व्यक्तिगत रूपात मोहसीन नक्वी यांना समजावले आणि बहिष्काराच्या दुष्परीणामांची माहिती दिली.त्यासोबत अमिनुल इस्लाम पाकिस्तानला पत्रही लिहले होते. दरम्यान आता पाकिस्तानने बहिष्काराच्या भुमिकेतून माघार घेतल्याने हा सामना व्यवस्थित पार पडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्याआधी ICCचा मोठा निर्णय, जय शहा मोहसीन नक्वी समोरा समोर येणार, हायव्होल्टेज ड्रामा होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल