TRENDING:

T20 World Cup आधी इशान किशनला ICC ने दिलं मोठं गिफ्ट, तर तिलक वर्माला दिला 'जोर का झटका'

Last Updated:
ICC World Rankings : न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकणाऱ्या ईशान किशन याला आयसीसीने मोठं गिफ्ट दिलंय. ईशान किशनच्या आयसीसीच्या रँकिंगमध्ये तब्बल 32 रँकने वाढ झाली असून तो आता 32 व्या पोझिशनवर आहे.
advertisement
1/7
T20 World Cup आधी इशान किशनला ICC ने दिलं मोठं गिफ्ट, तर तिलक वर्माला धक्का
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेत शतक ठोकून धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ईशान किशनची दखल आयसीसीने घेतली आहे. गंभीरला किंमत नव्हती पण आयसीसीने टायमिंग साधलंय.
advertisement
2/7
इशानच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप अधिक मजबूत झाली आहे. या खेळाडूंच्या फॉर्ममुळे भारतीय टीम सध्या प्रचंड आत्मविश्वासात असून आगामी वर्ल्ड कपमध्ये भारताचे पारडे जड मानले जात आहे.
advertisement
3/7
तर न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकणाऱ्या ईशान किशन याला आयसीसीने मोठं गिफ्ट दिलंय. ईशान किशनच्या आयसीसीच्या रँकिंगमध्ये तब्बल 32 रँकने वाढ झाली असून तो आता 32 व्या पोझिशनवर आहे.
advertisement
4/7
भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपले अव्वल स्थान कायम राखले असून, रेटिंगमध्ये थोडी घसरण होऊनही तो जगातील नंबर वन फलंदाज ठरला आहे.
advertisement
5/7
दुसरीकडे, भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा याला मात्र फटका बसला आहे. गेल्या अनेक काळापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला तिलक आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.
advertisement
6/7
तसेच शिवम दुबे याची रँकिंग देखील 17 अंकाने वधारली आहे. तो आता 43 व्या स्थानी पोहोचलाय. तर संजू सॅमसनच्या रँकिंगमध्ये 5 स्थानाची घसरण झालीये.
advertisement
7/7
दरम्यान, बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराहची रँकिंग दोन अंकानी खाली गेली असून बॉ़लिंगमध्ये अव्वल स्थानी टीम इंडिया वरुण चक्रवर्ती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup आधी इशान किशनला ICC ने दिलं मोठं गिफ्ट, तर तिलक वर्माला दिला 'जोर का झटका'
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल