TRENDING:

India vs Pakistan : भारत 8, पाकिस्तान 1; SKYच्या हुशारीने PAKचे सरेंडर, पहिल्या बॉलआधीच टीम इंडियाचा विजय कसा ठरला!

Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे बहिष्काराच्या नाट्यानंतर भारताने हा सामना जिंकून पाकिस्तानला जोरदार चपराक लगावली आहे.
advertisement
1/9
भारत 8, पाकिस्तान 1; SKYच्या हुशारीने PAKचे सरेंडर, पहिल्या बॉलआधीच टीम इंडियाचा
श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिमवर सूरू असलेल्या हायव्होल्टेज सामन्याच भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 175 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
advertisement
2/9
भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक 40 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत. त्याच्यासोबच सूर्यकुमार यादवने 32 धावांची खेळी केली होती. त्यानंतर शेवटच्या क्षणी शिवम दुबने 17 बॉल 28 आणि रिंकूने 4 बॉल 11 धावा केल्या. या बळावर भारताने 175 धावा केल्या होत्या.
advertisement
3/9
दरम्यान भारताने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण हार्दिक पांड्याने पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर साहिबजादा फरहानची विकेट घेतली होती. फरहान शुन्यावर बाद झाला.
advertisement
4/9
साहिबजादा फरहान बाद झाल्यानंतर कॅप्टन सलमान आगा मैदानात आला होता. त्याच्यासोबत साईम अयुब मैदानात होता. पण जसप्रीत बुमराहने सामन्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलला साईम अयुबला एलबी डब्ल्यू आऊट केले. अयुब 6 धावांवर बाद झाला.
advertisement
5/9
त्याच्यानंतर त्याच ओव्हरच्या सहाव्या बॉलवर बुमराहने कॅप्टन सलमान आगाला हार्दिक पांड्याचा हातात कॅट आऊट केले होते. त्यामुळे आगा 4 वर बाद झाला होता.
advertisement
6/9
त्यानंतर उस्मान खान आणि बाबर आझम ही नवी जोडी मैदानात आली होती. या जोडीने पाकिस्तानचा डाव सावरायला सूरूवात केली होती. पण या दरम्यान अक्षर पटेलने बाबर आझमला क्लिन बोल्ड केले होते.तो 5 धावांवर बाद झाला होता.
advertisement
7/9
पावरप्लेमध्ये पाकिस्तानने 4 विकेट गमावून 38 धावा केल्या होत्या. त्यानंतर उस्मान खानने पाकिस्तानचा डाव सावरल होता. तो एकटाच होता जो पाकिस्तानकडून चांगली फलंदाजी करत होता. या दरम्यान अक्षर पटेलच्या बॉलवर उस्मान खान स्टम्प आऊट झाला. उस्मान खान 44 वर बाद झाला. पाकिस्तानकडून एका खेळाडूने केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या.
advertisement
8/9
त्यानंतर कुलदीप यादवच्या बॉलवर मोहम्मद नवाजने मोठा शॉर्ट खेळण्याच्या प्रयत्न केली होता. पण शिवम दुबेच्या हातात बॉल गेला आणि तो आऊट झाला. त्यानंतर तिलक वर्माच्या बॉलवर शॉर्ट मारण्याच्या प्रयत्नात शादाब खान देखील आऊट झाला.
advertisement
9/9
पाकिस्तान या बळावर 20 ओव्हरमध्ये 114 च धावा करू शकला त्यामुळे भारताने हा सामना 61 धावांनी जिंकला आहे. कॅप्टन सूर्याच्या हुशारीने भारताने हा सामना जिंकला आहे. कारण त्याला प्रथम फलंदाजी करायची होती. त्यानुसार त्याने फलंदाजी केली. संयमाने तो मैदानावर खेळला.त्यानंतर त्याने गोलंदाजांचाही चांगला वापर करून पाकिस्तानला एकामागून एक धक्के दिले. त्यामुळे सूर्याच्या या रणनितीमुळे भारताने हा सामना जिंकला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
India vs Pakistan : भारत 8, पाकिस्तान 1; SKYच्या हुशारीने PAKचे सरेंडर, पहिल्या बॉलआधीच टीम इंडियाचा विजय कसा ठरला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल