TRENDING:

IND vs NAM : 5 धावांवर 4 विकेट, नामिबियाच्या गोलंदाजानी टीम इंडियाला उघड पाडलं, गंभीरचे मोहरे फेल

Last Updated:
नामिबिया सारख्या संघाविरूद्ध जर टीम इंडियाची अशी अवस्था असेल तर टीम इंडिया बलाढ्य संघासमोर कशी खेळणार आहे? असा मोठा प्रश्न आहे.
advertisement
1/9
फक्त 5 धावात 4 विकेट, नामिबियाने टीम इंडियाला उघड पाडलं, गंभीरचे 'मोहरे' फेल
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर नामिबिया विरूद्ध सामन्यात भारताने 209 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे नामिबियासमोर आता 210 धावांचे लक्ष्य असणार आहे.
advertisement
2/9
ईशान किशनच्या 61 धावांच्या अर्धशतकीय आणि हार्दिक पांड्याचे 52 धावांच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 209 धावा केल्या होत्या.
advertisement
3/9
या सामन्यात ईशान किशनने टीम इंडियाला 7 ओव्हरमध्ये 100 पार नेले होते.त्यामुळे इतर खेळाडूंना फक्त मैदानात टीकून खेळायची गरज होती, धावा आपोआप झाल्या होत्या.
advertisement
4/9
पण ईशान आऊट झाल्यानंतर भारताच्या डावाला उतरती कळाच लागली. एका मागून एक विकेट पडायलाच लागले होते.
advertisement
5/9
त्यातल्या त्यात हार्दिकने एका बाजूने डाव सावरत 52 धावांची अर्धशतकीय खेळी करत टीम इंडियाला 200 पार नेले होते.पण पुढे टीम इंडियाने नाकचं कापलं.
advertisement
6/9
205 धावांवर हार्दिक पांड्याची पाच विकेट पडली. त्याच्यानंतर त्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर रिंकूच्या चुकीच्या कॉलमुळे शिवम दुबे रनआऊट झाला.त्यानंतर अक्षर पटेल मैदानात आला होता.पण तो गोल्डन डकवर क्लिन बोल्ड झाला.
advertisement
7/9
रिंकूने दुबेला रनआऊट केल्यानंतर तो स्वता: देखील काही फटके मारेल असे अपेक्षित होते.पण तो 6 बॉलमध्ये 1 धाव करून कॅचआऊट झाला.
advertisement
8/9
त्यानंतर शेवटच्या बॉलवर दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात अर्शदिप सिंह रनआऊट झाला.अशाप्रकारे 205-5 वरून भारत 20 ओव्हरपर्यंत 9 विकेट गमावून 209 धावाच करू शकला.त्यामुळे अवघ्या 5 धावांमध्ये भारताने 4 विकेट गमावले होते.
advertisement
9/9
त्यामुळे शेवटच्या क्षणी टीम इंडिया उघडी पडली होती. विशेष म्हणजे नामिबिया सारख्या संघाविरूद्ध जर टीम इंडियाची अशी अवस्था असेल तर टीम इंडिया बलाढ्य संघासमोर कशी खेळणार आहे? असा मोठा प्रश्न आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NAM : 5 धावांवर 4 विकेट, नामिबियाच्या गोलंदाजानी टीम इंडियाला उघड पाडलं, गंभीरचे मोहरे फेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल