IND vs NZ : 250 मारले असते, पण न्यूझीलंड स्वस्तात गार झाली, 'त्या' दोन बॉलनी सामना फिरवला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली होती. कारण डेवॉन कॉन्वेने सामन्याच्या आणि अर्शदिपच्या पहिल्याच ओव्हरला 18 धावा काढल्या होत्या.
advertisement
1/7

न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली होती. कारण डेवॉन कॉन्वेने सामन्याच्या आणि अर्शदिपच्या पहिल्याच ओव्हरला 18 धावा काढल्या होत्या.
advertisement
2/7
त्यानंतर हार्दिकच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 7 धावा आणि पुन्हा अर्शदिपच्या ओव्हरमध्येल 18 अशा साधारण 3 ओव्हरमध्ये न्यूझीलंड 43 धावा काढल्या होत्या.
advertisement
3/7
त्याच्यानंतर हर्षित राणाने डेवॉन कॉन्वेची विकेट घेऊन धावांना ब्रेक लावला. हर्षितनंतर वरूण चक्रवर्तीने टीम सफर्टची विकेट काढली आणि न्यूझीलंडची सलामी जोडी बाहेर झाली.
advertisement
4/7
दोन्ही सलामीवर बाद झाल्यानंतर रचिन रविंद्रने ताबडतोब खेळी सूरू केली होती. या दरम्यान एका बाजूने विकेट पडतच होते.
advertisement
5/7
ग्लेन फिलिप्स 19 तर डेरी मिचेल 18 धावांवर बाद झाला.त्यानंतर कुलदीप यादवने अर्धशतकाच्या जवळ पोहोचणाऱ्या रचिन रविंद्रला 44 वर बाद केले आणि सामन्यात पुनरागमन केलं.
advertisement
6/7
रविंद्रनंतर मिचेल सॅटनरने 47 धावांची खेळी केली.या खेळीच्या बाळावर न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 208 धावा केल्या आहेत. खरं तर ज्या प्रमाणे न्यूझीलंड खेळत होती त्याप्रमाणे ती 250 मारू शकली असती पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना रोखले.
advertisement
7/7
टीम सिफर्ट आणि रचिन रविंद्र या दोघांची ज्या बॉलवर विकेट पडली,त्या बॉलमुळे सामना फिरला. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 2, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती आणि शिवम दुबेने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 250 मारले असते, पण न्यूझीलंड स्वस्तात गार झाली, 'त्या' दोन बॉलनी सामना फिरवला