IND vs NZ : टीम इंडियाच्या 6 स्टार खेळाडूंना वनडे सीरिजमधून डच्चू! नव्या वर्षी आगरकर-गंभीरचा पहिला धक्का
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वनडे सीरिजसाठी शनिवारी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. या सीरिजसाठी अनेक दिग्गज खेळाडूंना वगळलं जाण्याची शक्यता आहे.
advertisement
1/11

नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. हे 3 सामने 11 जानेवारीला बडोदा, 14 जानेवारीला राजकोट आणि 18 जानेवारीला इंदूर येथे होणार आहेत.
advertisement
2/11
शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा होईल. दुखापतीतून बरा झालेला शुभमन गिल टीममध्ये कमबॅक करेल, तसंच त्याच्याकडे वनडे टीमची कॅप्टन्सीही असेल. पण त्याआधी गिल पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे.
advertisement
3/11
गिलचं कमबॅक झाल्यामुळे यशस्वी जयस्वालला पुन्हा एकदा बेंचवर बसावं लागू शकतं. गिल टीममध्ये नसताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये जयस्वाल खेळला. या सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात जयस्वालने शतक ठोकलं. पण गिलच्या कमबॅकमुळे जयस्वालला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावं लागू शकतं.
advertisement
4/11
जगातील नंबर वन वनडे बॅटर रोहित शर्मा आणि विराट कोहली या सीरिजमध्ये निश्चितच खेळतील. या दोघांच्या बॅटिंगची क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत.
advertisement
5/11
श्रेयस अय्यर दुखापतीतून बरा झाला असला तरी तो पूर्णपणे फिट झालेला नाही, त्यामुळे त्याची वनडे सीरिजसाठी निवड व्हायची शक्यता कमी आहे.
advertisement
6/11
श्रेयस अय्यरचं टीममध्ये कमबॅक होणार नसेल तर ऋतुराज गायकवाडचं स्थान कायम राहिल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ऋतुराजने चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना शतक ठोकलं होतं.
advertisement
7/11
केएल राहुल हा भारताचा वनडे क्रिकेटमधला पहिल्या पसंतीचा कीपर आहे, त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही तोच विकेट कीपर म्हणून खेळेल. बॅक अप विकेट कीपर म्हणून पंतला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
8/11
इशान किशन हा सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे, तसंच त्याची भारताच्या टी-20 वर्ल्ड कप टीममध्येही निवड झाली आहे. आता वनडे टीममध्येही इशान किशनच्या कमबॅकची शक्यता आहे.
advertisement
9/11
हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमधून विश्रांती देण्यात आली होती. आता न्यूझीलंडविरुद्धही हार्दिक आणि बुमराह मैदानात उतरणार नाहीत, हे निश्चित मानलं जात आहे. कुलदीप, रवींद्र जडेजा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना टीममध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
10/11
प्रसिद्ध कृष्णाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये 4 विकेट घेतल्या, पण पहिल्या दोन सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक झाली. प्रसिद्ध कृष्णाऐवजी मोहम्मद शमीला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मोहम्मद सिराजच्या पदरी पुन्हा निराशा येऊ शकते.
advertisement
11/11
भारताची संभाव्य टीम : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशवी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेट कीपर), इशान किशन (विकेट कीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : टीम इंडियाच्या 6 स्टार खेळाडूंना वनडे सीरिजमधून डच्चू! नव्या वर्षी आगरकर-गंभीरचा पहिला धक्का