TRENDING:

Team India : ऋषभ पंतचा पत्ता कट! टीम इंडियाचा दुसरा विकेट कीपर कोण? एका जागेसाठी तिघांमध्ये रेस

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी शनिवारी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीममध्ये बदल होण्याची शक्यता आहे, पण सर्वाधिक चर्चा विकेट कीपिंगबद्दल सुरू आहे.
advertisement
1/7
पंतचा पत्ता कट! टीम इंडियाचा दुसरा विकेट कीपर कोण? एका जागेसाठी तिघांमध्ये रेस
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमचा विकेट कीपर कोण असणार? याबाबत चर्चा सुरू आहे. केएल राहुल हा टीममध्ये असेल याबद्दल शंका नाही. राहुल हा पहिल्या पसंतीचा विकेट कीपर आहे, पण टीममध्ये बॅकअप ओपनर म्हणून कुणाला संधी मिळेल?
advertisement
2/7
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी ऋषभ पंतला संधी मिळणार नाही हे निश्चित मानलं जात आहे. अपघातातून परतल्यानंतर पंतने ऑगस्ट 2024 मध्ये फक्त एकच वनडे खेळली आहे. जो गंभीरचा टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून पहिला सामना होता.
advertisement
3/7
ऋषभ पंत 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय टीमचा भाग होता, पण टीम मॅनेजमेंटने केएल राहुलला पसंती दिल्याने पंतला संपूर्ण स्पर्धेत बेंचवरच बसावं लागलं. वनडे क्रिकेटमध्ये पंतला चांगली कामगिरी करता आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंतने 4 सामन्यांमध्ये फक्त 70 रन केल्या आहेत.
advertisement
4/7
ध्रुव जुरेलने विजय हजारे ट्रॉफीच्या 4 सामन्यांमध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकं केली आहेत. जुरेलने 108 ची सरासरी आणि 137.87 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी जुरेल टीममध्ये होता, त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धही तो कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
इशान किशन 2023-24 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मानसिक थकव्याचं कारण देऊन माघारी परतला. यानंतर त्याला टीमबाहेर केलं गेलं, पण सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर इशान किशनचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी इशान किशनची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे.
advertisement
6/7
2025-26 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकमेव सामन्यात इशान किशनने 39 बॉलमध्ये 125 रनची वादळी खेळी केली. इशान किशनचा सध्याचा फॉर्म बघता त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दुसरा विकेट कीपर म्हणून निवड होऊ शकते.
advertisement
7/7
संजू सॅमसनने डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचे शतक झळकावले., पण त्यानंतर संजू एकही लिस्ट ए मॅच खेळलेला नाही. संजू मागच्या 2 वर्षांमध्ये भारताकडून एकही वनडे मॅच खेळलेला नाही, पण टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये त्याची निवड झाली आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी संजूला वनडे टीममध्ये संधी मिळणार का? असा प्रश्न आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : ऋषभ पंतचा पत्ता कट! टीम इंडियाचा दुसरा विकेट कीपर कोण? एका जागेसाठी तिघांमध्ये रेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल