TRENDING:

IND vs PAK : एक नाही तर टीम इंडियामध्ये दोन सरप्राईज एन्ट्री, सूर्यकुमारने मॅचच्या 24 तास आधीच दिली हिंट

Last Updated:
IND vs PAK Suryakaumr yadav Press Conference : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला सामोरं गेला. त्यावेळी त्याने मोठा खुलासा केला आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
टीम इंडियामध्ये दोन सरप्राईज एन्ट्री, सूर्यकुमारने मॅचच्या 24 तास आधीच दिली हिंट
श्रीलंकेतील निसर्गाने नटलेल्या सुंदर अशा प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला सामोरं गेला. त्यावेळी त्याने मोठा खुलासा केला आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
सूर्यकुमार यादवने प्रेस कॉन्फरेन्समध्ये अभिषेक शर्मा खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यावेळी त्याने पाकिस्तानच्या कॅप्टनच्या शैलीत उत्तर दिलं. तर आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने दुसऱ्या नावाचा देखील उल्लेख केला.
advertisement
4/7
पत्रकार परिषदेमध्ये सूर्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी एक पाकिस्तानी पत्रकार देखील उपस्थित होता. एकाने यावेळी कुलदीप यादवच्या खेळण्यावर प्रश्न विचारला.
advertisement
5/7
प्रेमदासावर पीचची कंडिशन पाहता तुम्ही कुलदीप यादवला खेळवण्याचा विचार करत आहात का? असा प्रश्न केल्यानंतर सूर्यकुमारने त्यांना एका वाक्यात उत्तर दिलं.
advertisement
6/7
तुम्हाला तो (कुलदीप यादव) खेळवायचा आहे का? ठीक आहे मग तो खेळेल, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. त्यामुळे टीम इंडियामध्ये एक नाही तर दोन सरप्राईज एन्ट्री पहायला मिळतील, अशी शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरच्या खेळण्यावर सूर्याने प्रखर वक्तव्य केलं नाही. त्यामुळे रिंकु सिंगलाच पाकिस्तानविरुद्ध खेळवण्याचा निर्णय झाला असावा, अशी शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : एक नाही तर टीम इंडियामध्ये दोन सरप्राईज एन्ट्री, सूर्यकुमारने मॅचच्या 24 तास आधीच दिली हिंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल