IND vs SA : शुभमन गिलला घरच्या मैदानावर शेवटची संधी? आजही फ्लॉप ठरला तर...संजूला जागा मिळणार!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
शुभमन गिल आणि अभिषेक शर्माच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. त्यात हा सामना शुभमन गिलसाठी अखेरचा असण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसरा टी20 सामना आज न्यु चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सूरूवात होणार आहे.
advertisement
2/6
शुभमन गिल आणि अभिषेक शर्माच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. त्यात हा सामना शुभमन गिलसाठी अखेरचा असण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
या दुसऱ्या टी20 सामन्यात शुभमन गिलची बॅट चालणे खूप महत्वाचे आहे? कारण मागच्या 13 सामन्यात त्याच्या बॅटीतून मोठ्या धावाच आल्या नाही आहेत.त्यामुळे त्याच्या टी20 खेळीवर प्रचंड चर्चा सूरू आहे.
advertisement
4/6
शुभमन गिलने मागच्या 13 सामन्यात 20(9), 10(7), 5(8), 47(28), 29(19), 4(3), 12(10), 37*(20), 5(10), 15(12), 46(40), 29(16), 4(2) अशा धावा केल्या आहेत. यामध्ये कोणतीच अर्धशतकीय खेळी नाही आहे.
advertisement
5/6
खरं तर शुभमन गिलला टी20 मध्ये संधी मिळाल्या पासून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसनचा पत्ता कट झाला आहे. जयस्वाल तर आता संघातही नसतो तर संजू संघात असूनही त्याला जागात मिळत नाही आहे.
advertisement
6/6
या मालिकेच्या सुरुवातीला संजू सॅमसनला संघात संधी न मिळण्याच्या मुद्यावर देखील कर्णधार सूर्यकु्मार यादवने भाष्य केले होते. संघ व्यवस्थापनाला असे वाटले की गिलला संघातून वगळणे अन्यायकारक ठरेल. कारण तो सॅमसनपेक्षा निवडक्रमात पुढे होता आणि टी20 विश्वचषकानंतर लगेचच त्याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : शुभमन गिलला घरच्या मैदानावर शेवटची संधी? आजही फ्लॉप ठरला तर...संजूला जागा मिळणार!