TRENDING:

IND vs SA : Super 8 आधी आफ्रिकेने डाव टाकला, टीम इंडियाच्या सर्वांत मोठ्या शस्त्रावर घाव घालणार

Last Updated:
भारताचा सामना हा रविवारी साऊथ आफ्रिकेविरूद्ध असणार आहे. या सामन्याला आता दोन दिवसाचा कालावधी उरला असताना साऊथ आफ्रिकेने मोठा डाव टाकला आहे.
advertisement
1/7
Super 8 आधी आफ्रिकेने डाव टाकला, टीम इंडियाच्या सर्वांत मोठ्या शस्त्रावर घाव घाल
टी20 वर्ल्डकपमधील सुपर 8 च्या सामन्यांना उद्या शनिवारी 21 फेब्रुवारी 2026 पासून सूरुवात होत आहे. पहिला सामना हा न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तान आणि इंग्लंड विरूद्ध श्रीलंका यांच्यात रंगणार आहे.
advertisement
2/7
तर भारताचा सामना हा रविवारी साऊथ आफ्रिकेविरूद्ध असणार आहे. या सामन्याला आता दोन दिवसाचा कालावधी उरला असताना साऊथ आफ्रिकेने मोठा डाव टाकला आहे.
advertisement
3/7
साऊथ आफ्रिकेने भारता विरूद्ध सामन्यासाठी मैदानात सरावाला सूरूवात केली आहे. या सरावा दरम्यानचा एक फोटो व्हायरल होत आहे.
advertisement
4/7
या फोटोमध्ये साऊथ आफ्रिकेचा कोच एलबी मॉर्केल हा डाव्या हाताने फलंदाजी करतो आहे. याचा अर्थ तो गोलंदाजांना डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या बॅटरसना बॉलिंग कशी करायची याचे प्रशिक्षण देत आहे.
advertisement
5/7
भारतात नंबर एक म्हणजे सलामीपासून शेवटापर्यंत अनेक खेळाडू हे डाव्या हाताने फलंदाजी करतात. अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि तिलक वर्मा हे तिघेही डाव्या हाताने फलंदाजी करतात, त्याच्यानंतर शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर हे देखील तसेच फलंदाजी करतात.
advertisement
6/7
त्यामुळे भारतीय संघात जवळपास सहा खेळाडू डाव्या हाताने फलंदाजी करतात, भारताचं हेच मोठं अस्त्र आहे. या शस्त्राविरूद्ध लढण्यासाठी आता साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांनी डाव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजीची प्रॅक्टीस सूरू केली होती.
advertisement
7/7
दरम्यान आता एलबी मॉर्केल साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांना डावखुरा फलंदाजांविरूद्ध देत असलेली ट्रेनिंग किती फायद्याची ठरते. हे सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : Super 8 आधी आफ्रिकेने डाव टाकला, टीम इंडियाच्या सर्वांत मोठ्या शस्त्रावर घाव घालणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल