IND vs WI : 93 वर्षात जे कुणालाच जमलं नाही,तो पराक्रम बुमराहने करून दाखवला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वेस्टइंडिज विरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड कुणालाच जमला नाही आहे.
advertisement
1/7

वेस्टइंडिज विरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड कुणालाच जमला नाही आहे,जो आता बूमराहने करून दाखवला आहे.
advertisement
2/7
वेस्ट इंडिज विरूद्ध मालिकेत जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या होत्या.या 3 विकेटच्या बळावर बुमराहने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. यातला एक रेकॉर्ड तर ऐतिहासिक आहे.
advertisement
3/7
जसप्रीत बुमराहने या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 12 फलंदाजांना क्लिन बोल्ड केले आहे. त्याच्यानंतर मोहम्मद सिराज (9) आणि शमार जोसेफ (9) यांचा क्रमांक लागतो. मिचेल स्टार्क (7), स्कॉट बोलँड (6) आणि जोमेल वॉरिकन (6) यांचाही या यादीत समावेश आहे.
advertisement
4/7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, बुमराहने 2025 मध्ये गोलंदाजी करून 15 बळी घेतले आहेत, जे या वर्षी कोणत्याही पूर्ण सदस्यीय गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
advertisement
5/7
बुमराहने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 147 बळी घेतले आहेत. ज्यामुळे तो या यादीत भारतासाठी चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळे (186), कपिल देव (167) आणि रविचंद्रन अश्विन (151) यांचा क्रमांक लागतो. बुमराहने रवींद्र जडेजा (145) ला मागे टाकत यादीत अव्वल स्थान पटकावले.
advertisement
6/7
बुमराहने भारतात 50 कसोटी विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम त्याने अवघ्या 24 डावात केला आहे. विशेष म्हणजे 1932 साली भारताने पहिली टेस्ट खेळली होती, त्यानंतर आज 2025 मध्ये वेस्ट इंडिज विरूद्धचा सामना, अशा साधारण 93 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी कुणालाच करता आला नव्हती.
advertisement
7/7
बुमराहने कपिल देवचा विक्रम मोडला आहे. कपिल देवने 25 डावात भारतात 50 कसोटी विकेट घेतले होते. आता, बुमराह आणि जवागल श्रीनाथ हे संयुक्तपणे सर्वात जलद 50 बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्यानंतर कपिल देव (25), इशांत शर्मा (27) आणि मोहम्मद शमी (27) यांचा क्रमांक लागतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : 93 वर्षात जे कुणालाच जमलं नाही,तो पराक्रम बुमराहने करून दाखवला