Asia Cup साठी टीम इंडियाच्या 7 खेळाडूंचं स्थान पक्कं, 4 जागांसाठी तगडी फाईट! पाहा संभाव्य स्कॉड
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Team India Squad for Asia Cup 2025 : येत्या महिन्यात आशिया कप स्पर्धेला सुरूवात होत आहे. अशातच आता टीम इंडियात चार जागांसाठी तगडी फाईट पहायला मिळत आहे.
advertisement
1/7

इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया आशिया कपसाठी मैदानात उतरणार आहे. येत्या 10 सप्टेंबरपासून याचा श्रीगणेशा होईल. पहिला सामना युएईविरुद्ध खेळवला जाईल.
advertisement
2/7
तर सर्वात रोमांचक सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. अशातच सर्वजण वाट पाहतात ती टीम इंडियाच्या घोषणेची... टीम इंडियाचे 15 शिलेदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
3/7
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शुभमन गिल या सात खेळाडूंची टीम इंडियाची जागा निश्चित आहे.
advertisement
4/7
तर जसप्रीत बुमराह हा देखील आशिया कप खेळणार असल्याची दाट शक्यता आहे. मात्र, तो तीन दिवसानंतर खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात नसेल.
advertisement
5/7
त्याचबरोबर जितेश शर्मा आणि ध्रुव जुरैल या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटकीपरसाठी तगडी फाईट असेल. ऋषभ पंत जखमी असल्याने या दोघांसाठी सुवर्णसंधी आहे.
advertisement
6/7
एवढंच नाही तर अक्षर पटेल आणि शुभमन गिल या दोघांमध्ये व्हाईस कॅप्टन्सीची रेस आहे. अक्षरच्या खांद्यावर व्हाईस कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
advertisement
7/7
दरम्यान, हार्दिक पांड्या फिट असून तो आशिया कपमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. तर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये सध्या असंतोषाचं वातावरण आहे. मोहम्मद शमीला संधी मिळते का? हे देखील पहावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup साठी टीम इंडियाच्या 7 खेळाडूंचं स्थान पक्कं, 4 जागांसाठी तगडी फाईट! पाहा संभाव्य स्कॉड