TRENDING:

IPL 2026 : पाकिस्तानचा एकमेव खेळाडू जो आयपीएलमध्ये बंदी असतानाही खेळला,आता काय करतोय?

Last Updated:
एक खेळाडू असा होता जो आयपीएलमध्ये बंदी असतानाही खेळला होता.हा खेळाडू नेमका कोण आहे? आणि तो कोणत्या सीझनमध्ये खेळला होता? हे जाणुन घेऊयात.
advertisement
1/8
पाकिस्तानचा एकमेव खेळाडू जो आयपीएलमध्ये बंदी असतानाही खेळला,आता काय करतोय?
द हंड्रेड लीगमघ्ये काव्या मारनच्या सनरायझर्स लिडस संघाने पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमदला 2.24 करोडच्या किमतीत ताफ्यात घेतलं होतं. त्यामुळे काव्या मारनवर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे.
advertisement
2/8
पण मुंबईत 2008 साली झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर एकही पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही,असे बोलले जाते.
advertisement
3/8
पण असे अजिबात नाही आहे. कारण एक खेळाडू असा होता जो आयपीएलमध्ये बंदी असतानाही खेळला होता.हा खेळाडू नेमका कोण आहे? आणि तो कोणत्या सीझनमध्ये खेळला होता? हे जाणुन घेऊयात.
advertisement
4/8
2009 नंतर पाकिस्तानचा एकही खेळाडू आयपीएल खेळला नाही, असे बोलले जाते. पण पाकिस्तानचा अझर महमुद हा खेळाडू बंदीनंतरही आयपीएलच्या हंगामात खेळला होता.
advertisement
5/8
अझर महमूद पंजाब किंग्जकडून 2012 आणि 2013 च्या हंगामात खेळला होता.त्यानंतर कोलकत्ता नाईट रायडर्सकडून 2015 च्या हंगामात दिसला होता.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बंदी असतानाही अझर महमूद आयपीएल खेळला कसा?
advertisement
6/8
अझम महमुदने पाकिस्तानी प्लेअर म्हणून आयपीएलमध्ये नोंदणी केली नव्हती.तो युनायटेड किंग्डमला गेला तिकडे त्याने ब्रिटीश पासपोर्ट मिळवून आयपीएलसाठी इंग्लिश खेळाडू म्हणून नोंदणी केली होती. त्यामुळे अशाप्रकारे त्याने आयपीएलमध्ये प्रवेश केला होता.
advertisement
7/8
अझर महमूदने 23 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 29 विकेच मिळवले होते. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी 7.82 होता. या सामन्यांमध्ये त्याने 128 च्या स्ट्राईक रेटने 388 धावाही केल्या होत्या.
advertisement
8/8
अझर महमूद सध्या पाकिस्तानच्या टेस्ट टीमचा हेड कोच आहे.पण त्याचा कार्यकाळ संपुष्ठात आला आहे,तरी देखील तो अजूनही पदावर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पाकिस्तानचा एकमेव खेळाडू जो आयपीएलमध्ये बंदी असतानाही खेळला,आता काय करतोय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल