TRENDING:

IPLच्या इतिहासातली सर्वात मोठी डील, राजस्थान रॉयल्सची 153010000000 रुपयांना विक्री, कोण आहे नवा मालक?

Last Updated:
राजस्थान रॉयल्स संघाची विक्री झाली आहे.विशेष म्हणजे जितक्या रक्कमेला या संघाची विक्री झाली आहे, ते पाहता ही आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी डील आहे
advertisement
1/7
IPLच्या इतिहासातली सर्वात मोठी डील, राजस्थान रॉयल्सची 153010000000 रुपयांना विक्री, कोण आहे नवा मालक?
येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या हंगामाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/7
असे असताना राजस्थान रॉयल्स संघाची विक्री झाली आहे.विशेष म्हणजे जितक्या रक्कमेला या संघाची विक्री झाली आहे, ते पाहता ही आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी डील आहे.
advertisement
3/7
राजस्थान रॉयल्सला अमेरीकेचा व्यावसायिक काल सोमानी यांनी खरेदी केले आहे. ही डील 1.63 अरब अमेरीकन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 15,300 करोड रूपयात झाली आहे. ही रक्कम एकरकमी दिली जाणार आहे.
advertisement
4/7
दरम्यान ही डील पाहता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा सोमानी आहे तरी कोण? तर टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सोमानी यांना वॉलमार्ट परिवारातील अमेरिकन उद्योगपती रॉब वॉल्टन आणि हॅम्प परिवाराच्या पाठिंबा आहे. विशेष म्हणजे हा करार आगामी आयपीएल 2026 हंगामानंतर प्रभावी होईल.
advertisement
5/7
आयपीएल इतिहासातली ही सर्वात मोठी डील मानली जात आहे.कारण गेल्या वर्षी टॅरिंट ग्रुपने सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सकडून गुजरात टायटन्स संघातील 67 टक्के हिस्सा अंदाजे 5,025 कोटी रूपयांना विकत घेतला होता.ज्यामुळे या फ्रेचायजीचे मूल्य अंदाजे 7500 कोटी रुपये झाले होते.
advertisement
6/7
2021 मध्ये 5,625 कोटी रूपयांना संघ विकत घेतल्यानंतर सीव्हीसी कॅपिटलने आपला 33 टक्के हिस्सा कायम ठेवला आहे.
advertisement
7/7
दरम्यान मनीकंट्रोलने आधीच कळवले होते की, सोमानी ग्रुप राजस्थान रॉयल्सची फ्रेंचायजी विकत घेऊ शकतो.मनोज बदाळे यांची इमर्जिंग मिडिया व्हेंचर्सच्या माध्यमातून या फ्रेंचायजीमध्ये बहुसंख्य हिस्सेदारी होती. ज्यात अंदाजे 56 टक्के हिस्सा होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPLच्या इतिहासातली सर्वात मोठी डील, राजस्थान रॉयल्सची 153010000000 रुपयांना विक्री, कोण आहे नवा मालक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल