TRENDING:

Mohammad Shami : 29 वर्षांचा खेळाडू शमीचं करिअर संपवणार? आधी IPL मध्ये बाजी, आता विकेटसचा पाऊस पाडतोय

Last Updated:
रणजीत जम्मू काश्मीर आणि बंगाल यांच्यातला दुसरा सेमी फायनल सामना सूरू आहे. या सामन्यात मोहम्मद शमी आणि आकीब नबी यांच्यात विकेटस काढण्याची शर्यंतच लागली आहे.
advertisement
1/7
29 वर्षांचा खेळाडू शमीचं करिअर संपवणार? आधी IPL मध्ये बाजी, आता विकेटसचा पाऊस पा
टीम इंडियाचा सिनिअर गोलंदाज मोहम्मद शमी सध्या रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धा खेळतो आहे. या स्पर्धेत तो उत्कृष्ट गोलंदाजी करून टीम इंडियात पुन्हा संधी मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे.
advertisement
2/7
रणजी ट्ऱॉफीमध्ये त्याने विकेटसचा पाऊस पडला आहे. यासोबत त्याने गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीच अर्धशतकीय खेळी करून जबरदस्त कामगिरी केली होती. या कामगिरीच्या बळावर त्याची निवड होणे अपेक्षित होते. पण त्याची निवड होऊ शकलेली नाही आहे.
advertisement
3/7
दरम्यान मध्यंतरी शमीने निवड समितीवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता.निवड समितीला रिपोर्ट देणे माझे काम नाही.माझं काम मैदानावर खेळणे आहे,असे म्हणत त्याने निवड समितीला सूनावलं होतं. त्यानंतर त्याने कामगिरी सूरूच ठेवली पण टी20 वर्ल्डकपमध्ये त्याची निवड होऊ शकली नाही.
advertisement
4/7
या घडामोडीनंतर आता मोहम्मद शमीसमोर एक वेगळंच आव्हान निर्माण झालं आहे.हे आव्हान म्हणजे जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी डार आहे. आकीब नबी हा देखील शमीप्रमाणेच रणजी ट्ऱॉफी स्पर्धेत विकेटचा पाऊस पाडतो आहे.
advertisement
5/7
सध्या रणजीत जम्मू काश्मीर आणि बंगाल यांच्यातला दुसरा सेमी फायनल सामना सूरू आहे. या सामन्यात मोहम्मद शमी आणि आकीब नबी यांच्यात विकेटस काढण्याची शर्यंतच लागली आहे.
advertisement
6/7
कारण बंगालच्या पहिल्या डावात आकीब नबी डारने 5 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या पहिल्या डावात मोहम्मद शमीने एकट्याने 8 विकेट घेऊन अर्धा संघ तंबुत धाडला होता. त्यानंतर बंगालच्या दुसऱ्या डावात आकीब नबीने 4 विकेट घेतल्या होत्या. आता बंगालच्या दुसऱ्या डावात शमी किती विकेट काढतो? हे पाहावे लागेल.
advertisement
7/7
दरम्यान मोहम्मद शमी आणि आकीब नबी यांच्यात सध्या विकेटसची स्पर्धा सूरू आहे. ही स्पर्धा पाहता आता आकीब नबी शमीचं करिअर संपवण्याची शक्यता आहे. कारण निवड समिती निवड करताना नवख्या खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे शमीचं करिअर संपण्याची शक्यता आहे. दरम्यान हे खरंच होतं का? हे आगामी काळात कळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mohammad Shami : 29 वर्षांचा खेळाडू शमीचं करिअर संपवणार? आधी IPL मध्ये बाजी, आता विकेटसचा पाऊस पाडतोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल