TRENDING:

T20 World Cup 2026 पूर्वी न्यूझीलंड संघात मोठा उलटफेर; किवींचा स्टार खेळाडू बाहेर, संजू सॅमसनच्या दुश्मनाची एन्ट्री!

Last Updated:
New Zealand T20 World Cup 2026 squad : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसलाय. स्टार वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी काइल जेमीसनला संघात स्थान देण्यात आलंय.
advertisement
1/7
किवींचा स्टार खेळाडू WC मधून बाहेर, संजू सॅमसनच्या दुश्मनाची एन्ट्री!
भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडचा स्कॉड जाहीर करण्यात आला होता. अशातच आता न्यूझीलंड संघात मोठा बदल झाला आहे.
advertisement
2/7
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडच्या टीमसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा अनुभवी आणि वेगवान बॉलर अ‍ॅडम मिल्ने दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
advertisement
3/7
न्यूझीलंड क्रिकेटने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या SA20 लीगमध्ये बॉलिंग करताना मिल्नेला डाव्या मांडीची दुखापत झाली. त्यामुळे तो वर्ल्ड कप सामन्यात नसेल.
advertisement
4/7
स्कॅन रिपोर्टमध्ये ही दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागली आहे. मिल्नेच्या जागी संजू सॅमसनच्या एका दुश्मानला मुख्य टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. तो कोण? पुढे पाहा
advertisement
5/7
काइल जेमिसन याने संजू सॅमसनला अनेकदा त्रास दिला आहे. मागील टी-ट्वेंटीमध्ये त्याने संजूची विकेट देखील काढली होती. विशेष म्हणजे जेमिसन सध्या भारतीय दौऱ्यावर असून तो न्यूझीलंडच्या ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह खेळाडूंचा भाग होता.
advertisement
6/7
न्यूझीलंडचा संघ या वर्ल्ड कपमध्ये 'ग्रुप डी' मध्ये असून, त्यांचा पहिला सामना 8 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या मोठ्या मॅचपूर्वी मुख्य बॉलर बाहेर जाणं ही ब्लॅककॅप्ससाठी मोठी अडचण ठरू शकते.
advertisement
7/7
दरम्यान, मिल्नेने या वर्ल्ड कपसाठी खूप मेहनत घेतली होती आणि तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. दुखापतीमुळे त्याला स्पर्धेला मुकावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं न्यूझीलंडचे कोच रॉब वॉल्टर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 पूर्वी न्यूझीलंड संघात मोठा उलटफेर; किवींचा स्टार खेळाडू बाहेर, संजू सॅमसनच्या दुश्मनाची एन्ट्री!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल