TRENDING:

PAK vs SL : पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराट कोहलीचा सर्वांत मोठा रेकॉर्ड,बनला नंबर 1 बॅटर

Last Updated:
विराट कोहलीच्या नावावर 2014 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 319 धावा करण्याचा रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड आता पाकिस्तानी खेळाडूने मोडला आहे.
advertisement
1/9
पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराट कोहलीचा सर्वांत मोठा रेकॉर्ड,बनला नंबर 1 बॅटर
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज कँडीच्या मैदानावर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे.
advertisement
2/9
हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा आहे. कारण हा सामना जिंकून पाकिस्तानला दुसरा सेमीफायनलीस्ट होण्याची संधी आहे.
advertisement
3/9
या सामन्यात पाकिस्तानची पहिली फलंदाजी असल्याने त्यांना जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील.
advertisement
4/9
पाकिस्तानने जर प्रथम फलंदाजी करताना जर 160 धावा केल्या.तर त्यांना 95 धावांवर श्रीलंकेला ऑलआऊट करावं लागेल.म्हणजेच पाकिस्तानला श्रीलंकेचा 64 हून अधिक धावांनी पराभव करावा लागणार आहे.
advertisement
5/9
पण जर पाकिस्तान 64 धावांनी श्रीलंकेचा पराभव करू शकली नाही आणि तरी सामना जिंकली तरी ती स्पर्धी बाहेर होणार आहे. कारण सामना जिंकून ही त्यांना न्यूझीलंड नेररनरेट ने मागे टाकायचे होते.पण ते न होऊ शकल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे.
advertisement
6/9
दरम्यान या सामन्यात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने मोठा रेकॉर्ड केला आहे. फरहानने टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे.
advertisement
7/9
विराट कोहलीच्या नावावर 2014 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 319 धावा करण्याचा रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड आता साहिबजादा फरहानने मोडला आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकपमध्ये 4 वेळा 50 हून धावा करण्याच्या विराटच्या रेकॉर्डशी ही त्याने बरोबरी केली आहे.
advertisement
8/9
विशेष म्हणजे यामध्ये साहिबजादा फरहानने बाबर आझमचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. बाबरने 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये 303 धावा केल्या होत्या. हा रेकॉर्ड देखील त्याने मोडला.
advertisement
9/9
दरम्यान या धावा करून आता साहिबजादा हा आतापर्यंतच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs SL : पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराट कोहलीचा सर्वांत मोठा रेकॉर्ड,बनला नंबर 1 बॅटर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल