पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होताच रिटायरमेंट घेतली मागे, पराभवाचा सगळा राग मैदानात काढणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानचा पराभव हा शनिवारी रात्री झाला होता, तर रविवारी पाकिस्तानच्या एका खेळाडूने निवृत्ती मागे घेतली आहे
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकप 2026 मधून शनिवारी पाकिस्तान बाहेर झाली आहे. कारण पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जितक्या धावांची आवशक्यता होती.तितक्या धावांत त्यांना विजय मिळवता न आल्याने त्यांचा पराभव झाला आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानने शनिवारच्या सामन्यात श्रीलंकेचा पाच धावांनी पराभव केला होता. पण हा सामना जिंकूनही पाकिस्तान क्वालिफाय होऊ शकली नाही.
advertisement
3/7
कारण पाकिस्तानने 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी त्यांना 147 धावांत श्रीलंकेला रोखायचे होते. पण श्रीलंका धावांचा पाठलाग करताना 207 धावाच करू शकली होती.अशाप्रकारे पाकिस्तान 5 धावांनी सामना जिंकून देऊन वर्ल्ड कप बाहेर झाली होती.
advertisement
4/7
दरम्यान पाकिस्तानचा पराभव हा शनिवारी रात्री झाला होता, तर रविवारी पाकिस्तानच्या एका खेळाडूने निवृत्ती मागे घेतली आहे.तसेच राष्ट्रीय संघात खेळण्याची तयारी दर्शवली होती.
advertisement
5/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानचा लेग स्पिन गोलंदाज उस्मान कादिर आहे. उस्मानने रविवारी 1 मार्चला सकाळी अचानक आपली रिटायरमेंट मागे घेतली आहे. तसेच तो आता पुन्हा आता राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचीही माहिती दिली आहे.
advertisement
6/7
31 वर्षीय उस्मानने 3 ऑक्टोबर 2024 ला रिटायरमेंट घेतली होती.त्यानंतर आता दोन वर्षांनी त्याने पुन्हा यु टर्न घेतला आहे. पाकिस्तानी खेळाडूच्या या निर्णयानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.
advertisement
7/7
ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याला निवृत्ती मागे घ्यायला प्रेरीत केले होते. त्यामुळे या खेळाडूची प्रचंड चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होताच रिटायरमेंट घेतली मागे, पराभवाचा सगळा राग मैदानात काढणार