PSL सुरू होण्याआधी पाकिस्तानची लाज निघाली, 8 खेळाडूंनी सोडलं मैदान, काय घडलं?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आयपीएल 2026 पूर्वी सुरू होणाऱ्या पीएसएल 2026 मधून Jack Fraser McGurk सह आठ परदेशी खेळाडू माघार घेतल्याने Pakistan Super League संकटात.
advertisement
1/8

काही दिवसांतच आयपीएल 2026 च्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरू होण्याच्या 2 दिवस आधी म्हणजेच 26 मार्च पासून पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) ला सुरुवात होणार आहे.
advertisement
2/8
गेल्या काही काळात तणावाचं वातावरण खेळाडू देखील अनुभवत असल्यामुळे आता प्रश्न असा आहे की परदेशी खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण आतापर्यंत पाकिस्तान सुपर लीगच्या 11व्या हंगामातून आठ परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे.
advertisement
3/8
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या सीमा संघर्षामुळे, अफगाणिस्तानने आपल्या खेळाडूंना पीएसएलमध्ये सहभागी होण्यास आधीच बंदी घातली आहे. सहभागी होणाऱ्या इतर देशांच्या खेळाडूंनीही माघार घेऊन पाकिस्तानचा अनादर करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
4/8
हा अपमान यासाठी आहे की, पाकिस्तान आपल्या पीएसएल या टी-20 लीगची खूप प्रशंसा करतो, पण परदेशी खेळाडूंना एकेक करून सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरत आहे. परदेशी खेळाडू आता पीसीबीच्या कायदेशीर कारवाईच्या धमकीलाही न जुमानता सोडून जात आहेत.
advertisement
5/8
आतापर्यंत पीएसएल 2026 मधून आठ परदेशी खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये सर्वात नवीन ऑस्ट्रेलियाचा जॅक फ्रेझर मॅकगर्क आहे, जो रावळपिंडी फ्रँचायझीशी संबंधित होता.
advertisement
6/8
ऑस्ट्रेलियाचा स्पेन्सर जॉन्सन यानेही पीएसएलमधून माघार घेतली आहे. तो क्वेटा ग्लॅडिएटर्सशी संबंधित होता. वेस्ट इंडिजचे खेळाडू जॉन्सन चार्ल्स आणि गुट्टाकेश मोती यांनाही पीएसएल 2026 मधून वगळण्यात आले आहे. जॉन्सन कराची किंग्ससोबत होता, तर गुट्टाकेश लाहोर कलंदर्ससोबत होता.
advertisement
7/8
हैदराबाद किंग्समेन संघाकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ओटनील बार्टमननेही पीएसएलच्या 11व्या हंगामातून माघार घेतली आहे. पेशावर झल्मी संघाकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या टायमल मिल्सनेही पीएसएल 2026 ला रामराम ठोकला आहे.
advertisement
8/8
इस्लामाबाद युनायटेड संघाकडून खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझारबानीनेही पाकिस्तानच्या टी-20 लीगमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. पेशावर झल्मी संघाकडून खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाजनेही पीएसएल 2026 मधून माघार घेतली आहे. या खेळाडूंनी माघार घेण्याचे वेगवेगळी कारण सांगण्यात आली आली तरी नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PSL सुरू होण्याआधी पाकिस्तानची लाज निघाली, 8 खेळाडूंनी सोडलं मैदान, काय घडलं?