Yashasvi Jaiswal : रोहित-विराट संघात नसताना ड्रेसिंग रूमच वातावरण कसं असतं? जयस्वालने मोठी गोष्ट सांगितली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळतेय आहे. यातला पहिला सामना भारताने जिंकला आहे. तर दुसरा सामना हा उद्या 11 डिसेंबर 2025 ला महाराज यादविंद्र सिंह पीसीए स्टेडिअममध्ये रंगणार आहे.
advertisement
1/7

टीम इंडिया सध्या साऊथ आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळतेय आहे. यातला पहिला सामना भारताने जिंकला आहे. तर दुसरा सामना हा उद्या 11 डिसेंबर 2025 ला महाराज यादविंद्र सिंह पीसीए स्टेडिअममध्ये रंगणार आहे.
advertisement
2/7
या मालिकेतील टी20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत नाही आहेत.कारण या दोघांनी टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान हे दोन्ही खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये असतात किंवा नसतात तेव्हा वातावरण कसं असतं? यावर आता यशस्वी जयस्वालने मोठं विधान केलं आहे.
advertisement
3/7
"विराट आणि रोहित दोघेही उत्तम खेळाडू आहेत. जेव्हा ते आमच्यासोबत असतात तेव्हा ते आमच्यासारख्या तरुण खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देतात, असे यशस्वी जयस्वाल अजेंडा आज तक 2025 च्या व्यासपीठावर बोलला आहे.
advertisement
4/7
"दोघेही इतकी वर्षे भारतासाठी खेळले आहेत. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. जेव्हा ते आजूबाजूला असतात तेव्हा ते आम्हाला काय करायचे ते सांगतात. ते नेहमीच त्यांचे अनुभव शेअर करतात. दोघेही खूप आधार देतात आणि नेहमीच तरुण खेळाडूंना मदत करतात",असे देखील जयस्वाल म्हणाला आहे.
advertisement
5/7
जेव्हा दोन्ही दिग्गज संघात नसतात तेव्हा त्यांची आठवण येते. ते प्रत्येक परिस्थितीत खेळले आहेत.त्यांचा अनुभव नेहमीच कामी येतो. आम्ही आमच्या समस्या त्यांच्यासोबत शेअर करतो आणि क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतो, असे यशस्वी पुढे सांगतो.
advertisement
6/7
रोहित आणि कोहली दोघेही केवळ उत्तम खेळाडू नाहीत तर अद्भुत माणसे देखील आहेत.दोघेही खूप मजेदार आहेत ,असे जयस्वाल म्हणाला आहे.
advertisement
7/7
रोहितसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल यशस्वी म्हणाला की जेव्हा तो आपल्याला फटकारत नाही तेव्हा त्याला काहीतरी चूक झाल्यासारखे वाटते. कारण तो आपल्याला जितके प्रेम करतो तितकेच तो आपल्यालाही फटकारतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : रोहित-विराट संघात नसताना ड्रेसिंग रूमच वातावरण कसं असतं? जयस्वालने मोठी गोष्ट सांगितली