TRENDING:

Tata आणि Thar ला थेट भिडणार, येतेय टँकसारखी दणकट SUV; लाँचआधीच 5 स्टार रेटिंग, छ.संभाजीनगर कनेक्शन

Last Updated:
अशातच आता भारतात चीनची ऑटोमोबाईल कंपनी  Chery ही आपली एक दमदार अशी इलेक्ट्रिक  SUV iCaur V23 घेऊन येत आहे. JSW मोटर्सच्या मदतीने ही Chery कंपनी भारतात Chery iCaur V23 लवकरच  लाँच करणार आहे.
advertisement
1/9
Tata आणि Thar ला थेट भिडणार, येतेय टँकसारखी दणकट SUV; लाँचआधीच 5 स्टार रेटिंग
भारतात सध्या एकापेक्षा एक कार आणि एसयूव्ही येऊ घातल्या आहेत. त्यामुळे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. अशातच आता भारतात चीनची ऑटोमोबाईल कंपनी  चेरी (Chery) ही आपली एक दमदार अशी इलेक्ट्रिक  SUV iCaur V23 घेऊन येत आहे.
advertisement
2/9
JSW मोटर्सच्या मदतीने ही Chery कंपनी भारतात Chery iCaur V23 लवकरच  लाँच करणार आहे. पण, लाँच होण्याच्या आधीची  NCAP नॅशनल क्रॅश टेस्टमध्ये  5-स्टार रेटिंग मिळाले आहे.
advertisement
3/9
Chery iCaur V23 ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. NCAP नॅशनल ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये या गाडीला एडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन'मध्ये 31.77/32 गूण आहे. तर 'चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन'मध्ये 42.50/51 गुण मिळाले आहे. तर  'सेफ्टी असिस्ट फीचर्स'मध्ये 18/21 गूण मिळाले आहे.
advertisement
4/9
Chery iCaur V23 ला एकूण स्कोअर 91.02 गूण मिळाले आहे. याचा अर्थ ही गाडी पूर्णपणे ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ही  SUV फक्त दिसायला जितकी स्टायलिश आहे आणि तितकीच मजबूत सुद्धा आहे. 
advertisement
5/9
Chery iCaur V23 च्या चाचणीसाठी  H व्हेरियंटचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये स्टँडर्ड म्हणून 6 एअरबॅग्स, ESC इलेक्ट्रिक स्टॅबलिटी कंट्रोल,  ABS, सीटबेल्ट रिमाइंडर, AEB हे City आणि Inter-Urban दोन्ही प्रकार, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ऑटो हाय बीम, पादचारी सुरक्षा प्रणाली आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स दिलं आहे. 
advertisement
6/9
एवढंच नाहीतर लेन डिपॉर्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि लेन कीप असिस्ट सारखे हायटेक ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम ADAS लेव्हल सुद्धाा दिलं आहे. 
advertisement
7/9
Chery iCaur V23 ही दोन व्हेरियंटमध्ये येणार आहे, एक आहे 81.76 kWh ची सिंगल मोटर आणि दुसरा हा ड्युअल मोटरचा पर्याय मिळणार आहे. यामध्ये NMC बॅटरी पॅक असून जी 439 किमी इतकी रेंज देईल.
advertisement
8/9
ही मोटर 211 HP पॉवर आणि 292 Nm टॉर्क जनरेट करते. iCaur V23 अवघ्या 7.5 सेकंदात 0-100 किमी वेग गाठू शकते. या कारची टॉप स्पीड हा 140 किमी प्रतितास इतका आहे. 
advertisement
9/9
JSW ग्रुप भारतात लवकरच ही Chery iCaur V23 लाँच करणार आहे. यासोबतच आणखी एक दमदार अशी Jetour T2 एसयूव्ही लाँच करणार आहे.  Chery iCaur V23 ही एक  इलेक्ट्रिक ऑफ-रोडर सेगमेंटमधील एसयूव्ही असणार आहे.  दमदार लुक्स, मोठी रेंज आणि हाय सेफ्टी रेटिंगमुळे ही एसयूव्ही भाारतात थेट महिंद्रा मोटर्स आणि टाटा मोटर्सला टक्कर देणार आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata आणि Thar ला थेट भिडणार, येतेय टँकसारखी दणकट SUV; लाँचआधीच 5 स्टार रेटिंग, छ.संभाजीनगर कनेक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल