Sanju Samson : फेसबूकवर Hi अन् कॉलेजचं प्रेम बहारलं! वेस्ट इंडिजविरुद्धच्या इनिंगपेक्षा सुंदर संजूची लव्ह स्टोरी, धर्माच्या भिंती पाडून रचला संसार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sanju Samson Love story : भारतीय क्रिकेट टीमचा चेता म्हणजेच संजू सॅमसन याची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? शाहरुख खानपेक्षा याची स्टोरी कमी नाही. कॉलेजचं प्रेम कसं बहारलं? पाहा
advertisement
1/7

टीम इंडियाचा सुपरस्टार ओपनर संजू सॅमसन याने वेस्ट इंडिजविरुद्ध अफलातून आक्रमक खेळी केली अन् टीम इंडियाला विजयाचा मार्ग दाखवला. त्यामुळे आता भारतीय संघ सेमीफायनलला गेला. पण याच संजूची लव स्टोरी महितीये का? (Photo Courtesy - Sanju Samson instragram)
advertisement
2/7
कोणत्याही नात्यात महत्त्वाचा असतो विश्वास... याच विश्वासाच्या जोरावर संजू आणि त्याची पत्ना चारुलता यांनी मोठी मजल मारली. ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न या चार खांबांच्या जोरावर संजूने संसाराची गुडी उभारली.
advertisement
3/7
संजू सॅमसन आणि चारुलता रमेश यांची लव्ह स्टोरी तिरुवनंतपुरममधील मार इवानियोस कॉलेजमध्ये सुरू झाली. मात्र, सुरुवातीला केवळ ओळख असलेल्या या दोघांच्या नात्याला खरी दिशा तेव्हा मिळाली, जेव्हा संवाद अधिक वाढला.
advertisement
4/7
संजूने चारुलताला फेसबुकवर मेसेज केला आणि तिथूनच त्यांच्या संभाषणाला सुरुवात झाली. फेसबुकवरील त्या एका मेसेजमुळे सुरू झालेली ही ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि बघता बघता या मैत्रीचे रूपांतर एका घट्ट प्रेमाच्या बंधनात झाले.
advertisement
5/7
दोघांच्या नात्यात मैत्रीपेक्षाही जास्त एकमेकांवर असलेला विश्वास महत्त्वाचा ठरला. चारुलताचा संजूवर असलेला अतूट विश्वास त्याच्यासाठी नेहमीच उर्जेचा स्रोत राहिला असून, ती संजूची सर्वात मोठी फॅन आहे.
advertisement
6/7
आयपीएलची मॅच असो किंवा आंतरराष्ट्रीय सामने, चारुलता नेहमीच स्टँड्समध्ये बसून त्याला चीयर करताना किंवा पडद्यामागून त्याला खंबीर पाठिंबा देताना दिसते.
advertisement
7/7
दरम्यान, या दोघांची धार्मिक पार्श्वभूमी वेगळी असूनही त्यांनी कधीही या फरकाला आपल्या नात्यात अडथळा ठरू दिले नाही. त्यांनी प्रेम, आदर आणि एकमेकांबद्दलच्या समजूतदारपणावर आपल्या नात्याचा पाया रचला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sanju Samson : फेसबूकवर Hi अन् कॉलेजचं प्रेम बहारलं! वेस्ट इंडिजविरुद्धच्या इनिंगपेक्षा सुंदर संजूची लव्ह स्टोरी, धर्माच्या भिंती पाडून रचला संसार!