TRENDING:

इस्रायलच्या पंतप्रधानांचे कार्यालय उडवले, PM नेतन्याहू यांचे काय झाले माहिती नाही; इराणचा खळबळजनक दावा

Last Updated:

Israel Iran War News: इराणच्या Islamic Revolutionary Guard Corpsने दावा केला आहे की त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांच्या कार्यालय आणि Israeli Air Force च्या कमांडरच्या जागेवर लक्ष्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: इराण- इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता एक खळबळजनक वळण लागले आहे. Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने दावा केला आहे की त्यांनी ते इस्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांच्या कार्यालय आणि Israeli Air Force च्या कमांडरच्या जागेवर लक्ष्य केले आहे. Iran Times च्या अहवालानुसार IRGC ने असा दावा केला आहे की हल्ल्यानंतर नेतन्याहू यांच्याबद्दल स्पष्ट काही माहिती मिळाली नाही.
News18
News18
advertisement

आज सकाळी इराणने इस्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती AzerNEWS ने दिली आहे. हे वृत्त Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) च्या जनसंपर्क विभागाच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आला आहे. याशिवाय इराणने इस्रायली वायुसेनेच्या कमांडर उपस्थित असलेल्या ठिकाणालाही लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा हल्ला अत्यंत अचूक नियोजन करून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

advertisement

हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांची सद्यस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून, या कारवाईसंदर्भातील अधिक तपशील लवकरच जाहीर केले जातील, असे इराणी सूत्रांनी म्हटले आहे.

इराणमधील दोन वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांचा मृत्यू

दरम्यान इस्रायलच्या सैन्याने दावा केला आहे की इराणवरील पहिल्या टप्प्यातील हल्ल्यांमध्ये दोन वरिष्ठ इराणी गुप्तचर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लष्करी निवेदनानुसार, मृतांमध्ये सईद यह्या हमीदी आणि जलाल पूर हुसेन यांचा समावेश आहे.

advertisement

इस्रायली सैन्याच्या निवेदनानुसार, हमीदी हे इराणच्या गुप्तचर मंत्रालयात इस्रायलविषयक प्रकरणांचे उपमंत्री होते. त्यांनी ज्यू नागरिक, पाश्चिमात्य घटक आणि इराणी राजवटीविरोधक यांच्याविरुद्ध देशांतर्गत तसेच परदेशात ‘दहशतवादी कारवाया’ केल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच हुसेन हे इराणच्या गुप्तचर मंत्रालयातील गुप्तहेर विभागाचे प्रमुख असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायली लष्कराच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या दोघांसह इतर काही वरिष्ठ दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आले आहे.

advertisement

अणुऊर्जा केंद्रावर हल्ला- इराणचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेत (IAEA) इराणचे राजदूत Reza Najafi यांनी सांगितले की अमेरिका आणि इस्रायलने रविवारी इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केला. नेमके कोणत्या अणुस्थळावर हल्ला झाला असे विचारले असता त्यांनी सांगितले की, अमेरिका-इस्रायलने Natanz Nuclear Facility या अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केले.

‘नऊ महिन्यांत दुसरा हल्ला’

advertisement

अमेरिका आणि इस्रायल सरकारने मिळून केलेला हा हल्ला नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत झालेला दुसरा हल्ला आहे. हे सर्व हल्ले बेकायदेशीर, गुन्हेगारी स्वरूपाचे आणि निर्दयी आहेत. एका घटनेत त्यांनी एका प्राथमिक शाळेचा पूर्णपणे नाश केला, ज्यामध्ये किमान 165 मुलींचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणी जनतेला दिलेली तथाकथित मदत आणि स्वातंत्र्य हीच का? असा सवाल रेजा नजाफी यांनी केला.

‘अमेरिका-इस्रायलचे हल्ले गुन्हेगारी आणि बेकायदेशीर’

नजाफी म्हणाले, काल पुन्हा त्यांनी इराणच्या शांततापूर्ण आणि सुरक्षित अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केला. इराण अण्वस्त्रे तयार करू इच्छित आहे, हा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्यांनी आमच्या सर्वोच्च नेत्याला शहीद केले, जे एकमेव मुस्लिम धर्मगुरू होते ज्यांनी अण्वस्त्रांवर पूर्ण बंदी घातली होती.

त्यांनी आरोप केला की, खोटेपणा, फसवणूक आणि चुकीची माहिती हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे मूलभूत शस्त्र राहिले आहे. यालाच मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे शस्त्र म्हटले जाते.

नजाफी यांनी असेही म्हटले की, अमेरिकेने यापूर्वीही इतर देशांवर हल्ला करण्यासाठी चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारे दावे वापरले आहेत.  ही लढाई अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुरू केली, जे स्वतःला शांततेचे दूत म्हणवून घेतात आणि नोबेल शांतता पुरस्काराची अपेक्षा करतात. ते शांततेची भाषा बोलतात तेव्हा तेही खोटे असते, आणि ते कूटनीतीची भाषा बोलतात तेव्हा तो केवळ धोका असतो, असा आरोप त्यांनी केला.

IAEA बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची आपत्कालीन बैठक

दरम्यान इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलचे लष्करी हल्ले सुरू असताना व्हिएन्ना येथे International Atomic Energy Agency (IAEA) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची आपत्कालीन बैठक सुरू झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निरीक्षक संस्थेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांवर चर्चा करण्यात आली. ही बैठक रशियाच्या विनंतीवरून बोलावण्यात आल्याचे सांगितले जाते.

बोर्डचा कोणताही सदस्य बैठक बोलावू शकतो. ही आपत्कालीन बैठक आधीच नियोजित तिमाही बैठकीच्या एक तास आधी सुरू झाली. त्या तिमाही बैठकीच्या अजेंड्यावर इराणचा अणुकार्यक्रम आधीपासूनच होता. काही मुत्सद्द्यांनी सांगितले की, शनिवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये इराणी अणुस्थळांवर थेट हल्ला झाल्याचे कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत.

रेडिएशन पातळीबाबत इशारा

IAEA चे प्रमुख Rafael Mariano Grossi यांनी इशारा दिला आहे की, अद्याप इराणच्या सीमेजवळील देशांमध्ये किरणोत्सर्गाची पातळी सामान्य पार्श्वभूमीपेक्षा जास्त वाढलेली आढळलेली नाही. मात्र त्यांनी सावधगिरीचा इशारा देत म्हटले की, सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. संभाव्य रेडिओलॉजिकल गळतीमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये मोठ्या शहरांच्या तोडीच्या किंवा त्याहून मोठ्या भागांचे स्थलांतर करावे लागू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पहिला मान बाप्पाचा! दगडूशेठ गणपतीला तब्बल 2 हजार किलो द्राक्षांची आरास, Video
सर्व पहा

इराणच्या अणुऊर्जा नियामक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. संवादाचा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग शक्य तितक्या लवकर पुन्हा सुरू होईल, अशी आम्हाला आशा आहे. सर्व लष्करी कारवायांमध्ये अत्यंत संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले. IAEA प्रमुख ग्रॉसी यांनी शेवटी स्पष्ट केले की, “आपल्याला पुन्हा कूटनीती आणि चर्चेच्या मार्गावर परतले पाहिजे.

मराठी बातम्या/विदेश/
इस्रायलच्या पंतप्रधानांचे कार्यालय उडवले, PM नेतन्याहू यांचे काय झाले माहिती नाही; इराणचा खळबळजनक दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल