T20 World Cup : गंभीरचे लाडके, पण फायनलमध्ये बेंचवर बसणार,कोण आहेत टीम इंडियाचे खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडने आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे.
advertisement
1/10

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला आता काही तासात सुरूवात होणार आहे.
advertisement
2/10
वर्ल्ड कप फायनल सामन्याला संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही खेळाडू टॉससाठी 6.30 वाजता मैदानावर येतील.
advertisement
3/10
भारताला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडने आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे. तसेच यापूर्वी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नाही आहेत. आणि मायदेशात कोणत्याही टीमला टॉफी उचलण्याचा मान मिळाला नाही. हा मान आज भारताला मिळवण्याची संधी आहे.
advertisement
4/10
दरम्यान या सामन्यात टीम इंडिया संपूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरणार आहे. आज सगळा जोर पणाला लावुन खेळाडू मैदानात खेळणार आहेत.
advertisement
5/10
असे जरी असले तरी कोच गौतम गंभीरचे लाडके असलेले दोन खेळाडू वर्ल्डकप फायनलच खेळणार नाही आहेत. हे खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
6/10
या दोन खेळाडूंना वर्ल्ड कपमध्ये खेळायची फारशी संघी मिळाली नाही.एक-दोन सामने वगळता यांनी सामने खेळले आहेत.
advertisement
7/10
विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू उत्कृ्ष्ट क्रिकेट खेळतात. टीम इंडियाला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा ते मैदानात उभं राहून उत्कृष्ट क्रिकेट खेळतात.
advertisement
8/10
हे खेळाडू दुसरे तिसरे कुणी नसून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर आहे. सुंदरला टेस्टपासून इतर फॉरमॅटमध्ये गंभीर त्याला संधी देत आला आहे. सिराजच्या बाबतीत थोडंफार तसंच घडलं आहे.त्यामुळे ते गंभीरचे लाडके आहेत.
advertisement
9/10
मोहम्मद सिराज वर्ल्ड कपमध्ये फक्त युएस विरूद्धचा सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 3 विकेट काढल्या होत्या.
advertisement
10/10
तर वॉशिंग्टन सुदंरने नेदरलँड आणि साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामना खेळला होता. नेदरलँड विरूद्ध त्याला बॅटींगची संधी मिळाली नाही आणि गोलंदाजीत त्याने 4 ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या होत्या. आफ्रिकेविरूद्ध त्याने 11 धावा करून एक विकेट काढली होती. दरम्यान हे दोन्ही खेळाडू असे आहेत जे वर्ल्डकपची फायनल खेळणार नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : गंभीरचे लाडके, पण फायनलमध्ये बेंचवर बसणार,कोण आहेत टीम इंडियाचे खेळाडू?