TRENDING:

Abhishek Sharma : एका अर्धशतकानंतर 'ओव्हर कॉन्फिडन्स', युवराज भडकला, अभिषेकला सगळ्यांसमोर चप्पल दाखवली!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माला अखेर सूर गवसला आहे, पण तरीही अभिषेकचा गुरू युवराज सिंग हा त्याच्यावर नाराज आहे. युवराजने अभिषेक शर्माला सोशल मीडियावरूनच सुनावलं आहे.
advertisement
1/6
एका अर्धशतकानंतर 'ओव्हर कॉन्फिडन्स', युवराज भडकला, अभिषेकला चप्पल दाखवली!
आपला पहिलाच टी-20 वर्ल्ड कप खेळणारा अभिषेक शर्मा पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये शून्य रनवर आऊट झाला, यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेकने 15 रन केले, पण संपूर्ण इनिंगमध्ये अभिषेक संघर्ष करताना दिसत होता.
advertisement
2/6
4 सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर अभिषेक शर्माला टीममधून डच्चू मिळण्याची चर्चा सुरू होती, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संधी दिली. या सामन्यात अखेर अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये परतला.
advertisement
3/6
आधीच्या चुकांपासून सुधारत अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या बॉलपासून आक्रमण केलं नाही, तर थोडा वेळ तो खेळपट्टीवर थांबला. अभिषेकने 30 बॉलमध्ये 183.33 च्या स्ट्राईक रेटने 55 रन केले, ज्यात 4 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.
advertisement
4/6
अभिषेक शर्माने त्याच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. कृतज्ञ, लक्ष केंद्रित केलं आहे, पुढे जात आहे, असं कॅप्शन अभिषेक शर्माने त्याच्या या फोटोला दिलं आहे. अभिषेक शर्माच्या या फोटोंवर युवराज सिंगने कमेंट केली आहे.
advertisement
5/6
अभिषेक शर्माच्या पोस्टवर युवराजने चपलेचा इमोजी पोस्ट केला आहे. अभिषेकच्या या पोस्टवर युवराज सिंग नाराज आहे का? अशा कमेंटही चाहत्यांनी केल्या आहेत. अभिषेक शर्मा हा वर्ल्ड कपमध्ये अपयशी होत होता, तेव्हा अभिषेकसोबतच त्याचा गुरू युवराज सिंगलाही टार्गेट करण्यात आलं होतं.
advertisement
6/6
टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधला पुढचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध रविवार 1 मार्चला होणार आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्याआधी अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये आल्यामुळे टीम इंडियाची चिंता मिटली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : एका अर्धशतकानंतर 'ओव्हर कॉन्फिडन्स', युवराज भडकला, अभिषेकला सगळ्यांसमोर चप्पल दाखवली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल