T20 World Cup : संजू इन, पण अभिषेक-तिलकलाही संधी, टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमधून कुणाला काढलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलची रेस आता आणखी थरारक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केल्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला लाईफलाईन मिळाली आहे.
advertisement
1/8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 76 रननी पराभव झाल्यानंतर टीम इंडियासाठी सेमी फायनलला पोहोचणं अडचणीचं झालं होतं, पण आता दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केलं आहे.
advertisement
2/8
सेमी फायनलला पोहोचण्यासाठी आता टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करावा लागणार आहे. यातलाच टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना चेन्नईमध्ये होत आहे.
advertisement
3/8
या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आमच्याप्रमाणेच भारतालाही हा सामना जिंकणं गरजेचं आहे, असं सिकंदर रझा म्हणाला आहे.
advertisement
4/8
या सामन्याआधी अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माच्या फॉर्मवरून बरीच चर्चा झाली. या दोघांपैकी एकाला टीममधून डच्चू देऊन संजू सॅमसनला टीममध्ये आणण्याची मागणीही केली गेली. तसंच आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलला वगळून वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यावरूनही टीम इंडियावर टीका झाली.
advertisement
5/8
आम्हीही टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला असता. कधी कधी तणावामध्ये तुमच्याकडून चांगली कामगिरी येते. आमच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही जिंकलात किंवा हरलात तरी तुम्ही शिकता. मागची मॅच विसरा आणि निर्भय पणे खेळा, असं सूर्या म्हणाला आहे.
advertisement
6/8
या सामन्यात टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेलचं टीममध्ये कमबॅक झालं आहे, तर रिंकू सिंगला वगळून संजू सॅमसनची एन्ट्री झाली आहे.
advertisement
7/8
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
advertisement
8/8
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : संजू इन, पण अभिषेक-तिलकलाही संधी, टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमधून कुणाला काढलं?