Babar Azam : प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊनही बाबरची लाज काढली! पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा ड्रामा
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा 61 रननी दारूण पराभव झाला. या पराभवानंतर नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी टीमने बाबर आझमचा अपमान केला आहे.
advertisement
1/7

भारताविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून शाहिन आफ्रिदी आणि बाबर आझमला टीममधून काढण्याची मागणी केली गेली, कारण या दोघांची कामगिरी मागच्या काही काळापासून खूपच निराशाजनक झाली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यातही दोघं अपयशी ठरले.
advertisement
2/7
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने शाहिन आफ्रिदीला तर टीममधून बाहेर काढलं, पण बाबर आझमला टीममध्ये ठेवून त्याची अक्षरश: लाज काढली. भारताविरुद्धच्या खराब कामगिरीची शिक्षा बाबरला टीममध्ये ठेवून दिली गेली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
advertisement
3/7
या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानकडून साहिबझादा फरहान याने नाबाद शतकी खेळी केली, तर शादाब खानने नाबाद 36, सॅम अयुबने 14, सलमान आघाने 38, ख्वाजा नाफेने 5 रन केले, त्यामुळे पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 199/3 एवढा स्कोअर केला.
advertisement
4/7
बाबर आझम हा त्याच्या टी-20 करिअरच्या सुरूवातीच्या काळात ओपनिंगला बॅटिंग करायचा, पॉवर प्लेमध्ये बाबरला जलद रन करता येत नव्हते म्हणून त्याला मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. यानंतर टी-20 मध्ये बाबर चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊ लागला.
advertisement
5/7
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात मात्र बाबर आझमला बॅटिंगलाच पाठवलं गेलं नाही. पाकिस्तानकडून साहिबझादा फरहान आणि सॅम अयुब ओपनिंगला आले, तर सलमान आघा तिसऱ्या क्रमांकावर, ख्वाजा नाफे चौथ्या आणि शादाब खान पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आले.
advertisement
6/7
बाबर आझमला मोठे शॉट खेळता येत नाहीत, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही चांगला नसल्यामुळे त्याला ओपनिंगवरून मिडल ऑर्डरमध्ये आणलं गेलं, पण आता तर बाबरला बॅटिंगलाच पाठवलं गेलं नाही.
advertisement
7/7
भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने अक्षर पटेलच्या बॉलिंगवर खराब शॉट खेळला, ज्यावरून त्याच्यावर चौफेर टीकाही झाली. या खराब शॉटमुळेच बाबरला बॅटिंगला न पाठवून त्याला शिक्षा दिल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Babar Azam : प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊनही बाबरची लाज काढली! पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा ड्रामा