सलीम खान यांच्याबाबत सलमानसह कुटुंबियांचा मोठा निर्णय, हॉस्पिटलकडे केली 'ही' मागणी; यापुढे रुग्णालय...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salim Khan health update: सलीम खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळताच सलमान, अरबाज आणि सोहेल खान या तिन्ही भावांनी आता रुग्णालयाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे.
advertisement
1/8

बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या २४ तासांपासून अख्खा देश ज्या बातमीची वाट पाहत होता, ती सकारात्मक बातमी अखेर डॉक्टरांनी दिली आहे.
advertisement
2/8
मेंदूतील रक्तस्त्रावामुळे (Brain Haemorrhage) लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या सलीम खान यांच्यावर करण्यात आलेली 'DSA' (Digital Subtraction Angiography) ही महत्त्वाची प्रक्रिया यशस्वी झाली आहे.
advertisement
3/8
सलीम खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळताच सलमान, अरबाज आणि सोहेल खान या तिन्ही भावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या दिलासादायक बातमीसोबतच खान कुटुंबाने आता रुग्णालयाकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे.
advertisement
4/8
बुधवारी दुपारी न्यूरोसर्जन डॉ. नितीन दांगे यांच्या नेतृत्वाखाली सलीम खान यांच्यावर 'DSA' ही प्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, सलीम खान यांना जेव्हा रुग्णालयात आणलं गेलं, तेव्हा त्यांचा रक्तदाब अत्यंत वाढलेला होता.
advertisement
5/8
तपासणीत मेंदूत सौम्य रक्तस्त्राव आढळला. सुदैवाने, यासाठी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करावी लागली नाही. केवळ योग्य औषधोपचार आणि तांत्रिक प्रक्रियेद्वारे हा रक्तस्त्राव थांबवण्यात यश आलं आहे. सध्या त्यांच्या शरीरातील रक्तप्रवाह अगदी सुरळीत सुरू आहे.
advertisement
6/8
सलीम खान व्हेंटिलेटरवर आहेत हे ऐकताच चाहत्यांच्या काळजात धस्स झालं होतं. पण डॉक्टरांनी आता स्पष्ट केलंय की, ९० वर्षांचं वय लक्षात घेता, शरीराच्या इतर अवयवांवर ताण येऊ नये म्हणून त्यांना 'प्रिकॉशनरी व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात आलं आहे. उद्या, गुरुवारी सकाळी त्यांना व्हेंटिलेटरवरून बाहेर काढलं जाण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
7/8
हॉस्पिटलबाहेर होणारी मीडियाची गर्दी पाहता, खान कुटुंबाने हॉस्पिटल प्रशासनाला विनंती केली आहे की, "यापुढे सलीम खान यांच्या प्रकृतीबाबत कोणतंही अधिकृत मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करू नये." आपल्या वडिलांचा खासगीपणा जपला जावा आणि त्यांना शांततेत विश्रांती मिळावी, हाच यामागचा उद्देश असल्याचं समजतंय.
advertisement
8/8
डॉक्टरांनी माहिती दिली की, 'डीएसए' तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने मेंदूतील ब्लॉकेज, मेंदूतील फुगीर किंवा कमकुवत रक्तवाहिनी, रक्तवाहिनीतील गाठ किंवा गुंता यांसारख्या समस्या शोधण्यासाठी होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलीम खान यांच्याबाबत सलमानसह कुटुंबियांचा मोठा निर्णय, हॉस्पिटलकडे केली 'ही' मागणी; यापुढे रुग्णालय...