प्रॉब्लेम संजूचा नाही तर... T20 वर्ल्ड कपची टीम सिलेक्ट केली, पण आता लक्षात आली सगळ्यात मोठी चूक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत भारताने 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
advertisement
1/8

टी-20 वर्ल्ड कपच्या आधीची शेवटची सीरिज टीम इंडियाने जिंकली असली, तरी टीमची निवड करताना झालेल्या चुकीमुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीरचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
2/8
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी तिलक वर्माला दुखापत झाली, त्यामुळे तो या सीरिजमधून बाहेर झाला. पण टी-20 वर्ल्ड कपपर्यंत तिलक वर्मा फिट झाला तरी टीम इंडियासाठी दुसरी डोकेदुखी समोर आली आहे.
advertisement
3/8
तिलक वर्मा फिट झाला तर तो थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये येईल आणि तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल. अशा परिस्थितीमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला टीमबाहेर जावं लागेल. संजू टीमबाहेर गेला तर इशान किशन आणि अभिषेक शर्मा ओपनिंगला खेळतील.
advertisement
4/8
तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा, चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, सहाव्या क्रमांकावर शिवम दुबे, सातव्या क्रमांकावर रिंकू सिंग आणि आठव्या क्रमांकावर अक्षर पटेल बॅटिंग करेल.
advertisement
5/8
टीम इंडियाच्या या बॅटिंग लाईन अप वर नजर टाकली तर 8 पैकी तब्बल 6 खेळाडू हे लेफ्ट हॅण्डर आहेत. अभिषेक, इशान, तिलक, शिवम दुबे, रिंकू सिंग आणि अक्षर पटेल हे 6 खेळाडू डावखुरी बॅटिंग करत असल्यामुळे विरोधी टीमच्या बॉलरना त्यांच्या लाईन ऍण्ड लेन्थ मध्ये कोणताही बदल करावा लागणार नाही.
advertisement
6/8
दुसरीकडे तिलक वर्मासोबत वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीमुळे सीरिजबाहेर आहे. वॉशिंग्टन सुंदर हा वर्ल्ड कपच्या टीममध्ये आहे, त्यामुळे तो फिट होऊन टीममध्ये आला तरी तोदेखील डावखुरी बॅटिंग करतो.
advertisement
7/8
इतक्या डावखुऱ्या बॅटरना घेऊन खेळणं हे टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी अडचणीच ठरू शकतं. 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे, त्यामुळे त्याआधी टीम इंडिया त्यांची रणनीती बदलणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
advertisement
8/8
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
प्रॉब्लेम संजूचा नाही तर... T20 वर्ल्ड कपची टीम सिलेक्ट केली, पण आता लक्षात आली सगळ्यात मोठी चूक!