ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर, एक बॉल ही न खेळता झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये; बलाढ्य कांगारूंचं वस्त्रहरण!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांचातला टी-20 वर्ल्ड कपचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे, पण या पावसाने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे.
advertisement
1/5

सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाठी या सामन्यात आयर्लंडच्या विजयासाठी ऑस्ट्रेलिया प्रार्थना करत होती, पण केन्डीच्या पॅलकेल्लीमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू होता, त्यामुळे मॅचमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही.
advertisement
2/5
ग्रुप बी मध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाचा यंदाच्या वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला होता, त्यामुळे त्यांचा सुपर-8 ला पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला होता. ऑस्ट्रेलियासाठी सुपर-8 चं आव्हान कायम ठेवण्यासाठी आयर्लंडविरुद्ध झिम्बाब्वेचा पराभव होणं गरजेचं होतं.
advertisement
3/5
झिम्बाब्वेचा आयर्लंडविरुद्ध पराभव झाला असता आणि ऑस्ट्रेलियाने ओमानला मोठ्या फरकाने हरवलं असतं, तर ऑस्ट्रेलिया सुपर-8 मध्ये पोहोचली असती, पण आयर्लंड-झिम्बाब्वेचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने आता झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये पोहोचली आहे आणि ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
advertisement
4/5
झिम्बाब्वेने ग्रुप स्टेजमध्ये 3 पैकी 2 सामने जिंकले तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे झिम्बाब्वेच्या खात्यात 3 सामन्यांमध्ये 5 पॉईंट्स झाले आहेत, तसंच त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा एक सामना शिल्लक आहे, पण त्या सामन्याला आता अर्थ उरला नाही.
advertisement
5/5
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने ओमानविरुद्ध कितीही मोठा विजय मिळवला तरी त्यांचे जास्तीत जास्त 4 पॉईंट्स होतील, पण झिम्बाब्वेचे आधीच 5 पॉईंट्स झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ओमानविरुद्धच्या सामन्यानंतर घरी परत जावं लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर, एक बॉल ही न खेळता झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये; बलाढ्य कांगारूंचं वस्त्रहरण!