TRENDING:

IND vs NZ : एकाला ड्रेसिंग रूमची गोष्ट लीक करणं भोवलं, दुसऱ्याला आगरकरसोबतचा वाद, दोन्ही खेळाडूंना संघात नो एंन्ट्री

Last Updated:
नवीन वर्षात न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड तीन सामन्यांची वनडे मालिका तर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी आज बीसीसीआयने टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली आहे.
advertisement
1/7
एकाला ड्रेसिंग रूमची गोष्ट लीक करणं भोवलं, दुसऱ्याला आगरकरसोबतचा वाद, दोन्ही खेळ
नवीन वर्षात न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड तीन सामन्यांची वनडे मालिका तर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.
advertisement
2/7
या मालिकेसाठी आज बीसीसीआयने टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली आहे. या संघातून दोघांना डच्चू देण्यात आला आहे. तसेच या दोघांना संघात न घेण्यामागची वेगळी कारणे आहे.
advertisement
3/7
यातला पहिला खेळाडू मोहम्मद शमी आहे. मोहम्मद शमी भारतासाठी मार्च 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना शेवटचा खेळला होता. त्याच्यानंतर त्याला टीम इंडियात संधीच मिळाली नव्हती.
advertisement
4/7
या दरम्यानच्या काळात तो देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. यावेळी त्याने प्रत्येक सामन्यात आपल्या गोलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. पण फिटनेसवरून त्याचा निवड समिती अध्यक्षांसोबत वाद देखील झाला होता.
advertisement
5/7
क्रिकेट खेळणे माझं काम आहे, मी फिट आहे की नाही हे तपासणे निवडम समितीचे काम असल्याते बोलून शमीने वाद ओढवून घेतला होता. त्यामुळेच आता त्यांची संघात निवड होत नसल्याचे बोलले जात आहे.
advertisement
6/7
दुसरा खेळाडू सरफराज खान आहे. सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो आहे.मात्र तरी देखील त्याला संधी देण्यात येत नाही आहे.
advertisement
7/7
यामागचे कारण म्हणजे सरफराज टीम इंडियाच्या एका दौऱ्यात असताना त्याने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी लीक केल्या होत्या. या वादानंतर त्याची टीम इंडियात एंन्ट्रीच झाली नाही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : एकाला ड्रेसिंग रूमची गोष्ट लीक करणं भोवलं, दुसऱ्याला आगरकरसोबतचा वाद, दोन्ही खेळाडूंना संघात नो एंन्ट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल