डॅडींच्या मुलीला कसं पटवलं? योगितासोबतच्या लव्हस्टोरीवर अक्षय वाघमारेचा मोठा खुलासा, म्हणाला 'आमच्या लग्नाला विरोध...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Akshay Waghmare-Yogita Gawli Love Story: मराठी अभिनेते अक्षय वाघमारे यांनी आपली रिअल लाईफ फिल्मी लव्हस्टोरी कशी सुरू झाली, याचा रंजक खुलासा केला आहे.
advertisement
1/9

मुंबई: ज्या नावाची दहशत एकेकाळी अख्ख्या मुंबईत होती, ज्यांच्या एका शब्दाखातर भायखळ्याची दगडी चाळ शांत व्हायची, त्या डॉन अरुण गवळी म्हणजेच 'डॅडीं'च्या जावई होणं ही काही सोपी गोष्ट नाही.
advertisement
2/9
सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रान तापलंय आणि गवळींची कन्या योगिता गवळी भायखळ्यातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
advertisement
3/9
पण, निवडणुकीच्या या धावपळीत त्यांचे पती आणि मराठी अभिनेते अक्षय वाघमारे यांनी आपली रिअल लाईफ फिल्मी लव्हस्टोरी कशी सुरू झाली, याचा रंजक खुलासा केला आहे.
advertisement
4/9
अक्षय वाघमारेला जेव्हा विचारण्यात आलं की, "भाऊ, डॅडींच्या मुलीला प्रेमात पाडण्याचं धाडस तू केलंत कसं?" तेव्हा अक्षय खळखळून हसला. तो म्हणाला, "खरं सांगायचं तर हे सगळं ठरवून झालं नाही. योगिताचे चुलत भाऊ माझे मित्र होते. त्यांच्यामुळे आमची ओळख झाली. २०१८ मध्ये मी 'ती फुलराणी' नावाची मालिका करत होतो, तेव्हा ती एमआयटीमध्ये शिकत होती. भेटीगाठी वाढत गेल्या आणि आमचे स्वभाव एकमेकांना पटले. मग काय, मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं."
advertisement
5/9
योगिता गवळींनीही यावर आपली मोहर उमटवली. त्या म्हणाल्या, "आमच्यात आधी मैत्रीच होती. एकमेकांसोबत आम्ही खूप कम्फर्टेबल होतो आणि तिथेच आमचं क्लिक झालं."
advertisement
6/9
एका बाजूला अभिनयाचं क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला अंडरवर्ल्डचा इतिहास असलेली कौटुंबिक पार्श्वभूमी; हे नातं जुळणं सोपं नव्हतं. अक्षयने कबूल केलं की, सुरुवातीला त्याच्या घरातून या लग्नाला थोडा विरोध झाला होता. पण जेव्हा अक्षयचे आई-वडील डॅडी आणि मम्मीला भेटले, तेव्हा चित्रच बदललं.
advertisement
7/9
"माझ्या पालकांना वाटलं होतं की डॅडी खूप कडक असतील, पण ते प्रत्यक्ष भेटल्यावर कळलं की ते किती साधे आहेत. डॅडींनी आणि मम्मीने आमच्या लग्नाला पूर्ण पाठिंबा दिला. शेवटी दोन्ही घरची मोठी माणसं म्हणाली, 'संसार तुम्हाला करायचा आहे, तुम्ही दोघं सुखी असाल तर आमचा काहीच विरोध नाही'," असं अक्षयने सांगितलं.
advertisement
8/9
वर्षानुवर्षे तुरुंगात असलेले अरुण गवळी आता बाहेर आले आहेत. त्यांच्या येण्याने मुंबई निवडणुकीची गणितं बदलणार का? यावर बोलताना योगिता गवळींनी आत्मविश्वास व्यक्त केला.
advertisement
9/9
अखिल भारतीय सेनेकडून उमेदवारी दाखल करताना त्यांनी सांगितलं की, लोकांचं डॅडींवर आजही तितकंच प्रेम आहे. मुंबईचा महापौर ठरवण्यात डॅडी आणि अपक्ष उमेदवारांची भूमिका कळीची ठरेल, असा दावा त्यांनी केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डॅडींच्या मुलीला कसं पटवलं? योगितासोबतच्या लव्हस्टोरीवर अक्षय वाघमारेचा मोठा खुलासा, म्हणाला 'आमच्या लग्नाला विरोध...'